October 16, 2024 8:46 PM October 16, 2024 8:46 PM
15
लेबननच्या नाबतिह शहरावर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात ६ जणांचा मृत्यू
लेबननच्या नाबतिह शहरावर इस्रायलने आज केलेल्या हवाई हल्ल्यात महापौरासह सहा नागरिकांचा मृत्यू झाला. इस्रायली लष्कराने झेबडीन आणि कफार तेबनीत या भागांवरही हल्ले केले. तर हिजबोल्लाहने उत्तर इस्रायलमधल्या कार्मिएलच्या दिशेने क्षेपणास्त्रं डागली.