October 6, 2025 1:00 PM October 6, 2025 1:00 PM
23
इस्रायलनं गाझावर केलेल्या हल्ल्यात ६५ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू
इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात गेल्या चोवीस तासात ६५ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर १५३ जण जखमी झाले आहेत. इस्रायली हल्ल्यात आतापर्यंत ६७ हजार १३९ जणांचा मृत्यू झाला असून १ लाख ७० हजार जण जखमी झाल्याचं गाझाच्या आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. संघर्ष सुरू झाल्यापासून उपासमारीने ४६० जणांनी प्राण गमावल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. गाझापट्टीतील संघर्ष थांबवण्याबाबत चर्चा सुरू असतानाही गेल्या ४८ तासात इस्रायलने १३० हून अधिक हवाई हल्ले केल्याचं वृत्त आहे.