August 3, 2024 10:22 AM August 3, 2024 10:22 AM

views 10

आवश्यकता नसल्यास स्राइलचा प्रवास टाळा

इस्राएल मधील भारतीय दुतावासाने भारतीय नागरिकांसाठी सतर्कता सूचना जारी केली आहे. इस्राइलमध्ये आवश्यकता नसल्यास प्रवास टाळावा असं या सुचनेत म्हटलं आहे. इस्राइलने हिजबूल गटाचा सर्वोच्च कमांडर फुआद शुक्र याला ठार केलं, त्यामुळे या प्रदेशात तणाव वाढला आहे. गोलान हाइट्समधे झालेल्या हल्ल्याचा आपण बदला घेतल्याचा दावा इस्राइलने केला आहे. इस्राइलमध्ये वास्तव्याला असलेल्या नागरिकांनी सतर्क राहावे तसंच स्थानिक अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार सुरक्षा नियमांचं पालन करावं असं आवाहन भारतीय दूतावसाने केलं आहे.

July 20, 2024 3:58 PM July 20, 2024 3:58 PM

views 9

वेस्ट बँक आणि पूर्व जेरुसलेममधली इस्राएलची उपस्थिती बेकायदेशीर – संयुक्त राष्ट्राचे आंतरराष्ट्रीय न्यायालय

वेस्ट बँक आणि पूर्व जेरुसलेममधली इस्राएलची उपस्थिती बेकायदेशीर असल्याचं संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. गाझा आणि वेस्टबँकमधला भूप्रदेश हस्तगत करण्याच्या इस्रायलच्या धोरणालाही न्यायालयाने चुकीचं ठरवलं असून या प्रदेशातली कार्यवाही तातडीनं थांबवण्याचा सल्ला दिला आहे. न्यायालयाचा हा सल्ला इस्रायलला कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक नाही, पण नैतिकदृष्ट्या याचं पालन केलं तर आंतरराष्ट्रीय कायद्यांचं पावित्र्य राखलं जाईल असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

July 5, 2024 2:49 PM July 5, 2024 2:49 PM

views 15

इस्रायलने वेस्ट बँकमध्ये ताबा मिळवलेल्या भागात छावण्या बांधायला मंजूरी

इस्रायलने वेस्ट बँकमध्ये ताबा मिळवलेल्या भागात निर्वासितांसाठी ५ हजार २९५ छावण्या बांधायला इस्रायलच्या उच्चस्तरीय नागरी व्यवस्थापन नियोजन मंडळाने मंजूरी दिली आहे. वेस्ट बँकमधली बारा पूर्णांक सात दशांश चौरस किलोमीटर जागा वापरण्याची परवानगी इस्रायल प्रशासनाने दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी हा निर्णय मंडळाने जाहीर केला आहे. गेल्या तीस वर्षात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर गाझा पट्टीतली जागा इस्रायलकडून वापरात आणली जाणार आहे.