October 7, 2024 10:35 AM October 7, 2024 10:35 AM
9
इस्राइलच्या लष्करानं अतीदक्षतेचा इशारा
दरम्यान, हमास या दहशतवादी संघटनेनं इस्राइलवर हल्ला केल्याच्या घटनेला आज वर्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर इस्राइलच्या लष्करानं अतीदक्षतेचा इशारा दिला आहे. गाझामधून लांब पल्ल्याच्या रॉकेटस् द्वारे किंवा अन्य प्रकारे हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेऊन इस्राइलनं गाझा सीमेवर मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केलं आहे. दरम्यान, इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी उत्तर सीमेवरील लष्करी ठाण्यांना भेट देऊन तिथल्या सैनिकांशी संवाद साधला. या सीमेजवळच हिज्बुल्लाह संघटनचे प्रमुख तळ आहेत.