January 19, 2025 1:48 PM January 19, 2025 1:48 PM

views 11

हमासबरोबरची युद्धबंदी लांबणीवर टाकल्याची इसराएलची घोषणा

इस्रायलनं हमासबरोबरची गाझामधली युद्धबंदी लांबणीवर टाकली आहे. मुक्तता करायचं ठरवलेल्या पहिल्या ओलीसांची यादी जोवर हमासकडून प्राप्त होत नाही तोवर युद्धविराम अंमलात येणार नाही, असं इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितलं.   भारतीय वेळेनुसार आज दुपारी बारा वाजता लागू होणार असलेला युद्धविराम सुरू न करण्याचे निर्देश नेत्यान्याहू यांनी संरक्षण दलांना दिले असल्याचं इस्रायलच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. हमासनं मात्र हा विलंब तांत्रिक कारणांमुळे झाल्याचं म्हटलं आहे. युद्धविराम कर...

January 18, 2025 9:39 AM January 18, 2025 9:39 AM

views 15

इस्रायल संरक्षण मंत्रिमंडळाकडून युद्धविरामाला मंजुरी

इस्राईलच्या संरक्षणविषयक मंत्रिमंडळानं काल हमास बरोबर युद्धकैद्यांची सुटका आणि युद्धविरामाला मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाने सरकारला तशी शिफारस केली आहे. गाझाच्या इतिहासात सर्वात घातक संघर्षापैकी एक असलेला संघर्ष संपवण्याच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल असेल. कतार, अमेरिका आणि इजिप्त यांनी वाटाघाटीतून झालेल्या या करारामुळे दोन्ही बाजूंकडे मोठ्या प्रमाणात झालेल्या जिवीतहानीचा संघर्ष थांबेल.   इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयानं काल दिलेल्या माहितीनुसार, संरक्षणविषयक मंत्रिमंडळानं सर्व राजकीय, सुरक...

January 16, 2025 8:57 PM January 16, 2025 8:57 PM

views 6

मतदानासाठी विलंब केल्याचा इस्राइलचा हमासवर आरोप

गाझा पट्टीतली युद्धबंदी आणि ओलिसांच्या सुटकेसाठीच्या करारावर मतदानासाठी विलंब केल्याचा आरोप इस्राइलने हमासवर केला आहे. मात्र, हमासने हा आरोप फेटाळून लावला असून युद्धबंदीसाठी वचनबद्ध असल्याचं म्हटलं आहे. येत्या रविवारपासून या कराराची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या करारानुसार, इस्रायली सैन्य गाझा पट्टीतून हळूहळू माघार घेईल आणि या युद्धबंदीला सुरुवात होईल. तसंच इस्रायलने ताब्यात घेतलेल्या पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात हमासने ओलीस ठेवलेल्यांची सुटका केली जाईल, असं या करारात नमूद करण्यात आलं आहे. 

January 3, 2025 8:32 PM January 3, 2025 8:32 PM

views 12

इस्रायलनं गाझा पट्टीत काल केलेल्या हल्ल्यात बालकांसह ३० जण ठार

इस्रायलनं गाझा पट्टीत काल रात्री केलेल्या हल्ल्यात काही बालकांसह किमान ३० जण ठार झाले असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. इस्रायलनं केलेल्या आदल्या दिवशीच्या हल्ल्यातही डझनभर नागरिक ठार झाले होते. त्यामुळं इस्रायलच्या हल्ल्यात गेल्या २४ तासांत ठार झालेल्या नागरिकांची संख्या ५६ वर पोचली असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.

November 27, 2024 1:42 PM November 27, 2024 1:42 PM

views 11

इस्त्रायल आणि लेबनॉन दरम्यान युद्धविराम लागू

इस्त्रायलनं लेबनॉनसह इतर भागात ६० दिवस युध्दविरामाची घोषणा केली आहे. अमेरिकेनं मध्यस्थी केल्यानंतर ही योजना आखण्यात आल्याचं इस्त्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी सांगितलं. युध्दविरामा संदर्भात इस्त्रायलच्या मंत्रीमंडळात प्रस्ताव सादर केला गेला आहे. इस्त्रायली सैन्य आणि हिजबुल्ला दरम्यान ६० दिवसांचा हा युध्दविराम असेल. लेबनॉनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी या कराराला आधीच पाठिंबा दर्शवला आहे. मात्र हिजबुल्लाहनं कराराचं उल्लंघन केल्यास त्वरित प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशाराही नेतन्याहू यांन...

November 17, 2024 1:36 PM November 17, 2024 1:36 PM

views 8

इस्रायली सैन्य लेबनॉनची हद्द ओलांडून ५ किलोमीटर अंतर्भागात/ इस्राएल वरच्या ५ ड्रोन हल्ल्यांची जबाबदारी इराकमधल्या इस्लामिक रेझिस्टन्स, शिया पंथी गटानं स्वीकारली

इराकमधील इस्लामिक रेझिस्टन्स, या शिया मिलिशिया गटानं आज दक्षिण आणि उत्तर इस्रायलमध्ये करण्यात आलेल्या पाच ड्रोन हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. दक्षिण इस्रायलमधील इलात बंदरातील चार महत्त्वाची ठिकाणे आणि लष्करी छावण्या आणि उत्तर इस्रायलमधील एक लष्करी छावणीला लक्ष्य करण्यात आलं असल्याचं या गटांन प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे. या ठिकाणांवर जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. पॅलेस्टाईन आणि लेबनॉनमधील लोकांना पाठिंबा म्हणून हे हल्ले करण्यात आले असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. इस्राइलमधील ...

October 29, 2024 1:43 PM October 29, 2024 1:43 PM

views 12

इस्रायलचा संरक्षण तंत्रज्ञान कंपन्यांसोबत ५३ कोटी ७० लाख डॉलर्सचा करार

इस्रायलने राफेल प्रगत संरक्षण प्रणाली आणि एल्बिट सिस्टीम नावाच्या दोन इस्रायली संरक्षण तंत्रज्ञान कंपन्यांसोबत ५३ कोटी ७० लाख डॉलर्सचा करार केला आहे. इस्रायलची लेझर संरक्षण प्रणाली आणखी मजबूत करणं हा या करारामागचा उद्देश आहे. या करारांतर्गत आयर्न बीम लेझर इंटरसेप्शन नावाच्या प्रणालीचं उत्पादन वाढवण्यात येणार आहे, जे पुढच्या वर्षभरात इस्रायलच्या हवाई संरक्षण सेवेत आणलं जाईल, अशी माहिती इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.

October 28, 2024 8:03 PM October 28, 2024 8:03 PM

views 11

इजिप्त अध्यक्षांनी गाझापट्टीवर दोन दिवसांच्या युद्धबंदीचा ठेवलेला प्रस्ताव इस्त्रायल प्रधानमंत्र्यांनी फेटाळला

इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फत्ताह अल सिसी यांनी  गाझापट्टीवर दोन दिवसांच्या युद्धबंदीचा  ठेवलेला प्रस्ताव इस्त्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी आज फेटाळला. अनेक  पॅलिस्टिनी कैद्यांच्या बदल्यात चार इस्त्रायली ओलिसांची सुटका करण्यासाठी या युद्धबंदीची मागणी सिसी यांनी अल्जेरियाचे अध्यक्ष अब्देलमादजिद यांच्या सोबत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत केली होती.

October 14, 2024 1:45 PM October 14, 2024 1:45 PM

views 9

अमेरिका इस्राइलला अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली देणार

अत्याधुनिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आणि ते चालवण्यासाठी शंभर सैनिकांची कुमक इस्रायलला पाठवणार असल्याची घोषणा अमेरिकेने आज केली.   T H A A D अर्थात टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स सिस्टम नावाची ही क्षेपणास्त्र प्रणाली इस्रायलला पाठवण्याचे आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी संरक्षण मंत्री लॉईड ऑस्टीन यांना दिले आहेत. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांवर जमिनीवरून मारा करण्याची क्षमता या प्रणालीत आहे. इराणने १ ऑक्टोबरला इस्रायलवर क्षेपणास्त्र डागल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने हे ...

October 14, 2024 10:37 AM October 14, 2024 10:37 AM

views 7

मध्य गाझा पट्टीतील शाळेवर इस्रायलने केलेल्या गोळीबारात 19 पॅलेस्टिनी ठार

मध्य गाझा पट्टीतील नुसेरात इथल्या निर्वासित शिबिरातील विस्थापित लोकांच्या शाळेवर इस्रायलने केलेल्या गोळीबारात किमान 19 पॅलेस्टिनी ठार आणि 80 जण जखमी झाल्याचं पॅलेस्टीनी सूत्रांनी सांगितलं आहे. मृतांमध्ये विशेषतः महिला आणि बालकांचा समावेश आहे.