February 20, 2025 10:52 AM February 20, 2025 10:52 AM

views 14

गाझामध्ये बंदीवासात मृत्यू झालेल्या 4 ओलिस इस्त्रायलकडे सुपूर्द

गाझामध्ये बंदीवासात मृत्यू झालेल्या चार ओलिसांना आज इस्त्रायलकडे सुपूर्द केलं जाणार आहे. या नागरिकांची यादी इस्त्रायलला मिळाली असल्याचं इस्त्रायलचे प्रधानमंत्री बेन्जामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयानं निवेदनाद्वारे काल जाहीर केलं.   संबंधित व्यक्तीच्या कुटुंबियांना याबाबत इस्त्रायलच्या संरक्षण दलाकडून कल्पना देण्यात आली असल्याचं एका समाजमाध्यमावरील संदेशात नमूद करण्यात आलं आहे. या ओलिसांचा मृत्यू हा देशासाठी अत्यंत कठिण काळ असल्याचं सांगत पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी तीव्र दुःख व्यक...

February 17, 2025 8:33 PM February 17, 2025 8:33 PM

views 15

इस्रायली लष्कराच्या हल्ल्यात हमासच्या मोहिम विभागाचा प्रमुख मोहम्मद शाहीन ठार

इस्रायलच्या लष्करानं आज दक्षिण लेबनॉनमध्ये केलेल्या ड्रोन हल्ल्यात हमासचा लष्कराच्या मोहिम विभागाचा प्रमुख मोहम्मद शाहीन ठार झाल्याचा दावा केला आहे. शाहीनने लेबनॉनच्या हद्दीतून दहशतवादी हल्ल्यांची योजना आखल्याचा आरोप इस्रायलनं केला आहे. 

February 12, 2025 8:38 PM February 12, 2025 8:38 PM

views 13

हमास बरोबरची युद्धबंदी संपवणार, इस्राइलच्या प्रधानमंत्र्यांचा इशारा

गाझा पट्ट्यातल्या ओलीस ठेवलेल्या इस्राइली नागरिकांची येत्या शनिवारपर्यंत सुटका केली नाही तर हमास बरोबरची युद्धबंदी संपवण्यात येईल असं सांगून त्यानंतर इस्राइल हल्ल्यांची तीव्रता आणखी वाढवेल असा इशारा इस्राइलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी दिला आहे. या निर्णयाला इस्राइलच्या मंत्रीमंडळानंही मान्यता दिल्याचं नेतान्याहू यांनी काल एका ध्वनीचित्रफितीद्वारे सांगितलं. येत्या शनिवारी ओलिसांची सुटका करण्याचं पुढं ढकलल्याची घोषणा हमासनं केल्यानंतर नेतान्याहू यांनी हा संदेश दिला आहे.

February 10, 2025 9:49 AM February 10, 2025 9:49 AM

views 16

नेटझरीम कॉरीडोरमधून इस्त्रायलच्या संरक्षण दलाची माघार

गाझापट्टीतील नेटझरीम कॉरीडोरमधून इस्त्रायली संरक्षण दलानं माघार घेतली आहे. इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युध्दबंदीच्या पार्श्वभूमी ही दलं मागे फिरली आहेत. दरम्यान या भागात सामान्य नागरिकांना स्थिरावण्याच्या उद्देशानं पॅलेस्टिनी पोलीसांनी या भागाचा ताबा घेतला आहे.

February 7, 2025 8:19 PM February 7, 2025 8:19 PM

views 10

गाझा पट्टीतल्या पॅलेस्टिनींना बाहेर काढण्यासाठी इस्राएलची तयारी सुरु

गाझा पट्टी ताब्यात घेण्याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी जाहीर विधानं केल्यानंतर गाझातल्या पॅलेस्टिनींना बाहेर काढण्यासाठी इस्राएलनं तयारी सुरु केली आहे. एकदा गाझातून बाहेर पडल्यानंतर इस्राएल पुन्हा परत येऊ देणार नाही अशी भीती वाटत असल्यामुळे पॅलेस्टिनींनी मात्र ट्रंप यांचा प्रस्ताव नाकारला आहे. गाझाचा ताबा घेऊन तिथल्या पॅलेस्टिनींना इतरत्र हलवून पूर्ण भूमीचा विकास करण्याचा प्रस्ताव ट्रंप यांनी जाहीर केला आहे. मात्र इजिप्त आणि इतर पश्चिम आशियाई देशांनी याला तीव्र विरोध दर्शवला ...

January 30, 2025 5:12 PM January 30, 2025 5:12 PM

views 15

इस्रायल – हमास ओलिस आणि युद्धकैद्यांची देवाणघेवाण करणार

युद्धविराम कराराचा भाग म्हणून इस्रायल आणि हमास आज तिसऱ्या टप्प्यात ओलिस आणि युद्धकैद्यांची देवाणघेवाण करणार आहेत. इस्रायलच्या तीन कैद्यांच्या बदल्यात गाझात अटक करण्यात आलेल्या तीन थाई नागरिकांची सुटका करण्यात येणार आहे. देवाणघेवाणीचा चौथा टप्पा लवकरच ठरवण्यात येणार असल्याचं दोन्हीकडच्या उच्चपदस्थांकडून सांगण्यात आलं आहे. हमासने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हल्ला केल्यानंतर ताब्यात घेतलेल्या इस्रायली कैद्यांना सोडायचं या करारात ठरलं आहे. या बदल्यात इस्रायल १ हजार ९०० पॅलेस्टिनी ओलिसांना सोडणार आहे. 

January 28, 2025 1:49 PM January 28, 2025 1:49 PM

views 7

इस्रायली सैन्याची युद्धबंदी कराराअंतर्गत गाझापट्टीतून माघार घ्यायला सुरुवात

इस्रायली सैन्याने युद्धबंदी कराराअंतर्गत गाझापट्टीतून माघार घ्यायला सुरुवात केली आहे. त्यानंतर हमासने या आठवड्यात तीन इस्रायली ओलिसांना सुपूर्द करायला सहमती दर्शवल्यानंतर काल गाझामधल्या पॅलेस्टिनी नागरिकांची सुटका करण्यात आली. हमासने दक्षिण इस्रायल भागावर केलेल्या हल्ल्यानंतर सुरू झालेल्या युद्धात गाझाच्या उत्तर भागातले सुमारे साडे सहा लाख पॅलेस्टिनी नागरिक विस्थापित झाले होते.

January 25, 2025 3:02 PM January 25, 2025 3:02 PM

views 24

युद्धविराम करारामध्ये ६० दिवसांच्या अंतिम मुदतीनंतरही लेबनीज सैन्य अद्याप तैनात

हिजबुल्लाहशी युद्धविराम करारामध्ये निर्धारित केलेल्या ६० दिवसांच्या अंतिम मुदतीनंतर देखील इस्रायली सैन्य दक्षिण लेबनॉनमध्ये राहील, असं इस्रायली सरकारनं म्हटलं आहे. करारानुसार लितानी नदीच्या दक्षिणेकडच्या भागातून हिजबुल्लाहची शस्त्रं आणि सैन्य काढून टाकणं आवश्यक होतं तरीही अद्याप त्यांच्या अटी पूर्ण करण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे इस्रायलनं हा निर्णय घेतल्याचं इस्रायली प्रधानमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे. दोन्हीकडच्या सैन्यानं उद्याच्या २६ जानेवारीपर्यंत दक्षिण लेबनॉनमधून माघार घेण्याचं मान्य केलं...

January 20, 2025 1:12 PM January 20, 2025 1:12 PM

views 22

इस्रायल-हमास यांच्यातील युद्धबंदी आणि ओलिसांच्या सुटका कराराची अंमलबजावणी

गाझात हमासच्या कैदेतून सुटलेले पहिले ३ बंधक इस्रायलमध्ये दाखल झाले आहेत. इस्रायल आणि हमास यांच्यात झालेल्या शस्त्रसंधी कराराच्या पहिल्या दिवशी काल इस्रायलच्या तीन महिलांची सुटका करण्यात आली. या महिलांच्या वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना त्यांच्या कुटुंबियांकडे पाठवण्यात येईल.    इस्रायलनं हमाससोबत झालेल्या शस्त्रसंधी करारानुसार ९० पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली आहे. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी या सुटकेचं श्रेय बायडन प्रशासन आणि नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या ट्रा...

January 19, 2025 8:31 PM January 19, 2025 8:31 PM

views 14

इस्रायल आणि हमास यांच्यात सहा आठवड्यांचा युद्धविराम

इस्रायल आणि हमास यांच्यातल्या सहा आठवड्यांचा युद्धविराम आज तीन तासांच्या विलंबानं सुरू झाला. सध्या सुरू असलेला  संघर्ष निवळण्याच्या दृष्टीनं हे महत्त्वपूर्ण पाऊल असून युद्धविरामाची सुरूवात झाल्याच्या वृत्ताला आज मध्यस्थ देश कतारनं पुष्टी दिली आणि सुरुवातीला सुटका होणाऱ्या तीन बंदिवानांपैकी काहीजण परदेशी नागरिक असल्याचं सांगितलं.   सुटका होणाऱ्या ओलिसांची यादी मिळाली असून यासंबंधीच्या तपशीलांची तपासणी सुरक्षायंत्रणा करत आहेत असं इस्रायलचे प्रधानमंत्री नेत्यान्याहू यांनी समाजमाध्यमावर सांगितल...