March 27, 2025 1:28 PM March 27, 2025 1:28 PM

views 3

इस्रायली सैन्याने गाझापट्ट्यात हवाई आणि जमिनीवरचे हल्ले वाढवले

इस्रायली सैन्याने गाझापट्ट्यात हवाई आणि जमिनीवरचे हल्ले वाढवले असून १८ मार्चपासून ते आजपर्यंत ४३०हून अधिक ठिकाणांवर हल्ले झाल्याचं हमासच्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. या हल्ल्यांमुळे दोन महिन्यांच्या युद्धबंदी कराराचं उल्लंघन झाल्याचंही हमासने म्हटलं आहे.   या हल्ल्यांमध्ये सुमारे ८३० जणांचा मृत्यू झाल्याचं गाझाच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं असून या काळात कोणत्याही इस्रायली नागरिकाच्या मृत्युची नोंद नसल्याचंही म्हटलं आहे.   इस्रायलनेही गाझापट्ट्यातून येणारी १४ क्षेपणास्त...

March 23, 2025 8:17 PM March 23, 2025 8:17 PM

views 21

इस्रायल-हमास युद्धात ५० हजारांहून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू

इस्रायल-हमास युद्धात ५० हजारांहून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले असल्याची माहिती गाझाच्या आरोग्य मंत्रालयानं दिली. या संघर्षात सुमारे १ लाख १३ हजारांहून अधिक जखमी झाले आहेत. आज ही ताजी आकडेवारी जाहीर करण्यात आली. गेल्या आठवड्यात इस्रायलने अचानक हवाई हल्ले करत युद्धबंदी संपवल्यापासून ६७३ लोकांचा मृत्यू झाला आहे. या संपूर्ण आकडेवारीत सैन्य आणि नागरिक असं विभाजन मंत्रालयानं केलेलं नाही.

March 22, 2025 8:23 PM March 22, 2025 8:23 PM

views 8

रॉकेट हल्ल्यानंतर इस्रायलचा लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर हल्ला

लेबाननमधून इस्त्रायलवर रॉकेटचा मारा झाल्यानंतर इस्त्रायलनं दक्षिण लेबाननच्या नियंत्रण कक्षावर रॉकेटनं प्रतिहल्ला चढवल्याची माहिती इस्त्रायलनं दिली आहे. नोव्हेंबरमधे युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर अशा पद्धतीचा हा पहिलाच हल्ला आहे.  इस्त्रायलच्या संरक्षण दलांना ही कारवाई करायला भाग पाडलं गेल्याचं इस्त्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यान्याहू यांनी म्हटलं आहे. या हल्ल्यात दोनजण मारले गेले असून ८ जखमी झाले आहेत. लेबानननं मात्र हल्ल्याच्या वृत्ताचं खंडन केलं आहे.

March 21, 2025 1:41 PM March 21, 2025 1:41 PM

views 21

हमासचे इस्त्राइलवर रॉकेट हल्ले

इस्रायलनं गाझामध्ये पुन्हा लष्करी कारवाया सुरू केल्यानंतर हमासने प्रथमच प्रत्युत्तरादाखल तेल अविववर रॉकेट हल्ले केले आहेत. त्यापैकी एक रॉकेट निकामी करण्यात आलं असून इतर दोन रॉकेट निर्जन क्षेत्रात पडल्याचं इस्रायलच्या संरक्षण दलानं सांगितलं.   दरम्यान, गाझामध्ये हमास संचालित आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की, इस्रायल मध्यरात्रीपासून करत असलेल्या हवाई हल्ल्यात किमान ८५ जणांचा मृत्यू झाला असून मंगळवार पासून आतपर्यंत ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून १३३ जण जखमी झाले आहेत. हमासने अजूनही ५९ जणां...

March 20, 2025 10:18 AM March 20, 2025 10:18 AM

views 8

इस्त्राईलचा गाझा पट्टीवर हवाई हल्ला, ४०० नागरिक ठार

इस्त्राईलने हमास विरुद्धच्या युद्धात अधिक सैन्य अभियानाचा विस्तार करून गाझा पट्टीवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला केला असून त्यात किमान 400 पॅलेस्टाईन नागरिक मारले गेल्याचा अंदाज आहे. ऑक्टोबर 2023 पासून इस्त्राईल हमास युद्ध सुरू झाल्यापासून हा सर्वात मोठा हल्ला आहे.   इस्त्राईलचे पंतप्रधान बेंज्यामीन नेत्यानाहू यांनी काल इस्राईलच्या दूरचित्रवाणी मध्यमावरून बोलताना सांगितल की, आता युद्ध सुरू असतानाच पुढील चर्चा सुरू राहील. इस्राईलच्या उरलेल्या बंधकांची सुटका करण्यासाठी युद्धाचा दबाव आणण...

March 18, 2025 8:43 PM March 18, 2025 8:43 PM

views 11

इस्राईलनं गाझावर केलेल्या हवाई हल्ल्यात ठार झालेल्यांची संख्या ४०० वर

इस्राईलच्या हवाई दलानं काल रात्री गाझावर केलेल्या हवाई हल्ल्यात ठार झालेल्या नागरिकांची संख्या ४०० झाली आहे. पॅलेस्टाईनच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते या हल्ल्यात ५०० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्राईल आणि हमास यांच्यातल्या संघर्ष विरामासंदर्भातील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर हा हल्ला झाला. १९ जानेवारी दोघांनी संघर्ष विराम करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतरचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला असल्याचं सांगितलं जात आहे.

March 4, 2025 8:37 PM March 4, 2025 8:37 PM

views 20

इस्राइलच्या हमासबरोबर युद्धबंदीच्या पुढच्या टप्प्यासाठी काही अटी

गाझा पट्टीत इस्राइलनं हमासबरोबर युद्धबंदीच्या पुढच्या टप्प्यासाठी काही अटी घातल्या आहेत. जानेवारीत लागू झालेल्या युद्धबंदी कराराच्या पुढच्या टप्प्यासाठी इस्रायल गाझा पट्टीचं निःशस्त्रीकरण, हमास राजवटीचा अंत आणि ओलीस ठेवलेल्या नागरिकांना परत करण्याची मागणी केल्याचं इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिडियन सार यांनी सांगितलं. दुसऱ्या टप्प्यासाठी अद्याप कोणताही अंतिम करार झालेला नाही. परंतु हमासनं या मागण्या मान्य केल्या तर उद्यापासून हा करार लागू केला जाईल, अशी माहितीही सार यांनी दिली.

March 4, 2025 1:52 PM March 4, 2025 1:52 PM

views 12

सीरियाच्या हवाई संरक्षण बटालियनवर इस्रायलचे हवाई हल्ले

इस्रायलनं तार्तुसजवळच्या सीरियाच्या हवाई संरक्षण बटालियनवर हवाई हल्ले केले आहेत. कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नसल्याचं सीरियाच्या सरकारी माध्यमांनी म्हटलं आहे. नुकसानीचा आढावा घेण्यासाठी सिरियन सिव्हिल डिफेन्सची पथकं तैनात करण्यात आली आहेत. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी दक्षिण सीरियाचं लष्करीकरण करण्याचं आवाहन केलं आहे, तर सीरियाचे हंगामी अध्यक्ष अहमद अल शारा यांनी नवीन सरकारला इस्रायलशी संघर्ष नको असल्याचं म्हटलं आहे.

February 23, 2025 1:50 PM February 23, 2025 1:50 PM

views 16

…तरच ६२० पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करणार – इस्रायल

पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासकडून ओलिसांच्या यापुढल्या गटाच्या सुटकेची पुष्टी होईपर्यंत आणि यासाठी कोणतीही अपमानास्पद वागणूक न देता ही सुटका केली, तरच ६२० पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका इस्रायल करेल, असं इस्रायलनं म्हटलं आहे. काल हमासनं सहा इस्रायली ओलिसांचं सार्वजनिक हस्तांतरण केल्यानंतर इस्रायलनं हा निर्णय घेतला. इस्रायली प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयानं जारी केलेल्या एका निवेदनात ही माहिती दिली आहे.

February 21, 2025 2:35 PM February 21, 2025 2:35 PM

views 10

इस्रायलमध्ये बात याम इथं ३ बसमध्ये स्फोट

इस्रायलमध्ये तेल अवीवजवळच्या बात याम इथं तीन बसमध्ये स्फोट झाले. या स्फोटांमध्ये कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही. मात्र या स्फोटांमुळे इस्रायलमधील वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली. दरम्यान, या स्फोटांमध्ये कोणताही सहभाग नसल्याचं हमासनं म्हटलं आहे.