June 21, 2025 2:42 PM June 21, 2025 2:42 PM

views 7

इस्राएलनं केलेल्या हल्ल्यांमुळे अणु प्रदूषणाचा धोका- राफेल ग्रोसी

इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर इस्राएलनं केलेल्या हल्ल्यांमुळे अणु प्रदूषणाचा धोका असल्याचं आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे महासंचालक राफेल ग्रोसी यांनी म्हटलं आहे. इराणमधल्या अणुप्रकल्पांवर झालेल्या हल्ल्यांमुळे तिथल्या आण्विक सुरक्षेत घट झाली आहे, मात्र गळती होणाऱ्या क्ष-किरणांनी अजूनही धोकादायक पातळी ओलांडली नसल्याचं ग्रोसी यांनी सुरक्षा परिषदेच्या आपत्कालीन बैठकीत  सांगितलं.

June 19, 2025 1:40 PM June 19, 2025 1:40 PM

views 6

इराण आणि इस्राईल यांच्यातला संघर्ष आणखी तीव्र

  इराण आणि इस्रायल यांच्यातला संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. इस्रायलनं इराणवर काल आणखी तीन टप्प्यांमध्ये हल्ले केले. त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढल्याचं इराणनं म्हटलं आहे. इस्रायलनं इराणच्या राष्ट्रीय पोलिसांचं मुख्यालयावर हल्ला केल्यानं अनेक जण जखमी झाले आहेत. तेहरानमधल्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र प्रकल्पासह चाळीस ठिकाणीही हल्ले करण्यात आले. सततच्या बाँबहल्ल्यांमुळं तेहरान आणि इतर शहरांमध्ये घबराट पसरली आहे.   आत्तापर्यंत सुमारे ५८५ जणांचा मृत्यू झाला, तर तेराशे जण जखमी झाल्याचं...

June 17, 2025 1:40 PM June 17, 2025 1:40 PM

views 4

इस्राईल आणि इराण यांच्यातल्या संघर्षात वाढ

इस्राईल आणि इराण यांच्यातला संघर्ष वाढत असून दोन्ही देश एकमेकांच्या पायाभूत सुविधा केंद्र आणि रहिवासी वस्त्यांवर हल्ले करत असल्याने संघर्षाची तीव्रता वाढत आहे. इस्राइलनं इराणची राष्ट्रीय प्रसारण सेवा संस्था इस्लामिक रिपब्लिक ऑफ ईराण ब्रॉडकास्टिंग, आयआरआयबीवर हल्ले केले. इस्राएलच्या पायाभूत सुविधा केंद्रांवर इराणनं केलेल्या हल्ल्यांना प्रत्त्युत्तर म्हणून हे हल्ले केल्याचं इस्राएलच्या सैन्य अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.   इस्राइलनं हवाई हल्ले थांबवावे याकरता अमेरिकेनं  हस्तक्षेप करावा असं आवाहन इ...

June 16, 2025 2:20 PM June 16, 2025 2:20 PM

views 10

इस्रायल – इराण युद्ध सुरूच

इस्रायल - इराण युद्धाचा आज चौथा दिवस आहे. तणाव कमी करण्याच्या अनेक देशांच्या आवाहनानंतरही दोन्ही बाजूंनी रात्रभर क्षेपणास्त्रांचा मारा सुरुच होता. आज सकाळी इस्रायली तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर हल्ला झाला त्यामुळे पॉवर ग्रिडचा काही भाग खराब झाला.   इराणच्या हल्ल्यांमुळे इस्रायलचे २० जण ठार झाले असून ३८० जण, मॅगेन डेव्हिड अ‍ॅडोम या इस्राएली सूत्रांनी दिली. इस्रायली हल्ल्यांमुळे इराणमध्ये किमान २२४ जणांचा मृत्यू झाला आहे आणि बाराशे पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत.   इस्रायलला पाश्चात्य द...