June 23, 2025 7:23 PM June 23, 2025 7:23 PM
1
इराणकडून डागण्यात आलेली क्षेपणास्त्र रोखल्यानंतर लष्करानं इराणवर हवाई हल्ले केल्याचा इस्रायलचा दावा
इराणकडून डागण्यात आलेली क्षेपणास्त्र रोखल्यानंतर लष्करानं इराणवर हवाई हल्ले केल्याचा दावा इस्रायलनं केला आहे. या हवाई हल्ल्यांनी इराणच्या केरमानशाह प्रांतातल्या लष्करी छावण्यांना लक्ष्य केलं असून क्षेपणास्त्र प्रक्षेपण आणि साठवण सुविधांवर हल्ला केला असल्याचं इस्रायलनं म्हटलं आहे. इराणनं देखील क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे इस्रायलवर हल्ले केले आहेत. इराणच्या संसदेनं जगातील सर्वात महत्त्वाचा तेल आणि वायू वाहतूक मार्ग असलेल्या होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव एकमतानं मंजूर केला आह...