December 14, 2025 2:56 PM December 14, 2025 2:56 PM

views 11

हमासच्या शस्त्रास्त्र निर्मिती विभागाचा प्रमुख ‘राद साद’ ठार

गाझा पट्टीत काल झालेल्या हल्ल्यात हमासच्या शस्त्रास्त्र निर्मिती विभागाचा प्रमुख ‘राद साद’ ठार झाल्याची माहिती इस्रायलने दिली आहे. सादने हमासच्या सैन्य उभारणीचं नेतृत्वही केलं होतं. दोन वर्षांपूर्वी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी ‘साद’ हा एक होता. त्याच्यामुळेच गाझामध्ये युद्ध सुरू झाल्याचं इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू आणि संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी आपल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. 

August 13, 2025 2:19 PM August 13, 2025 2:19 PM

views 8

ओलिसांविषयी तोडगा काढण्यासाठी हमासचं शिष्टमंडळ कैरो इथं पोहोचलं

गाझापट्टीत युद्ध थांबवण्यासाठी आणि ओलिसांविषयी तोडगा काढण्यासाठी इजिप्तच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी हमासचं शिष्टमंडळ खलील अल हया यांच्या नेतृत्वाखाली काल कैरो इथं पोहोचलं. साठ दिवसांच्या प्रस्तावित युद्धविरामाची अमलबजावणी करणं हा या वाटाघाटीचा हेतू आहे.   इजिप्तच्या मध्यस्थीने ठेवलेल्या प्रस्तावात युद्धबंदी, गाझापट्टीतून सैन्य माघार, हमासच्या कैदेतील सर्व ओलिसांची  सुटका आणि हमासच्या काही सदस्यांची हद्दपारी या अटी ठेवण्यात आल्या आहेत. या वाटाघाटींना अमेरिका आणि कतारचा पाठि...

April 6, 2025 12:57 PM April 6, 2025 12:57 PM

views 12

इस्रायनं गाझा पट्टीत केलेल्या गोळीबारात १५ आपत्कालीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू

इस्रायली  सैनिकांनी गेल्या आठवड्यात राफाजवळ दक्षिण गाझा पट्टीत केलेल्या गोळीबारात १५ आपत्कालीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची कबुली इस्रायलच्या लष्करानं दिली आहे. या ताफ्यात पॅलेस्टिनी रेड क्रेसेंट रुग्णवाहिका, संयुक्त राष्ट्रांचं  वाहन आणि अग्निशमन दलाचा समावेश होता. वाहनांचा हा ताफा दिवे न लावता अंधारात जात असल्याचं इस्रायलनं  यापूर्वी सांगितलं होतं. मात्र नंतर समोर आलेल्या छायाचित्रांमधून ही केवळ बतावणी असल्याचं समोर आलं. या वाहनांमधले सर्वजण निःशस्त्र होते.

March 27, 2025 8:30 PM March 27, 2025 8:30 PM

views 9

इस्रायलने केलेल्या हल्ल्यात हमासचा प्रवक्ता अब्देल लतिफ अल कुनोवा ठार

इस्रायलनं आज सकाळी हमासवर केलेल्या हवाई हल्ल्यात हमासचा प्रवक्ता अब्देल लतिफ अल कुनोवा ठार झाला. त्याच्या कुटुंबातले ६ सदस्यही या हल्ल्यात ठार झाल्याची माहिती हमासनं दिली आहे. इस्रायली विमानांनी आज सकाळी गाझाच्या उत्तरेला असलेल्या जबालिया इथल्या  तंबूवर केलेल्या हल्लात तो ठार झाला.  गाझा शहरावर झालेल्या दुसऱ्या एका हल्ल्यात ४ मुले व त्यांचे पालक ठार झाल्याचं गाझाच्या आरोग्य विभागानं सांगितलं.