October 9, 2025 1:37 PM October 9, 2025 1:37 PM
78
इस्राइल आणि हमास दरम्यान शांतता कराराच्या पहिल्या टप्प्यावर सहमती झाल्याची अमेरिकेची घोषणा
इस्राइल आणि हमास यांच्यात संघर्षविरामाबाबत तसंच ओलिसांची सुटका करण्यासाठीही सहमती झाली असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने आखलेल्या शांतता योजने अंतर्गत इस्रायल आणि हमासमध्ये ही सहमती झाली आहे. इजिप्तमधे शर्म अल-शेख इथं झालेल्या वाटाघाटींनंतर ट्रम्प यांनी ही घोषणा केली. शांतता कराराच्या पहिल्या टप्प्यात हमासने ताब्यात घेतलेल्या सर्व उर्वरित ओलिसांची सुटका केली जाणार असून इस्राइल गाझामधून टप्प्याटप्प्याने सैन्य माघारी घेणार आहे. इस...