April 24, 2025 8:05 PM April 24, 2025 8:05 PM

views 20

इस्रायलने उत्तर गाझामधे केलेल्या हल्ल्यात ९ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू

इस्रायलने उत्तर गाझामधे आज केलेल्या हल्ल्यात ९ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. मात्र, आपण हमास आणि इस्लामिक जिहाद केंद्राला लक्ष्य केल्याचं इस्त्रायलनं म्हटलं आहे. गाझा पट्टीत इतर भागात झालेल्या हल्ल्यात सहा जणांचं कुुटुंब तसंच छावणीत राहणारे पाच जण मृत्यूमुखी पडले आहेत. इस्रायलने १९ मार्चला गाझा पट्टीवर पुन्हा हल्ला सुरू केल्यानंतर १ हजार ९७८ जणांचा मृत्यू झाल्याचं गाझाच्या आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.  

February 10, 2025 9:49 AM February 10, 2025 9:49 AM

views 14

नेटझरीम कॉरीडोरमधून इस्त्रायलच्या संरक्षण दलाची माघार

गाझापट्टीतील नेटझरीम कॉरीडोरमधून इस्त्रायली संरक्षण दलानं माघार घेतली आहे. इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युध्दबंदीच्या पार्श्वभूमी ही दलं मागे फिरली आहेत. दरम्यान या भागात सामान्य नागरिकांना स्थिरावण्याच्या उद्देशानं पॅलेस्टिनी पोलीसांनी या भागाचा ताबा घेतला आहे.

August 13, 2024 9:57 AM August 13, 2024 9:57 AM

views 13

इस्राईल हवाई दलातल्या अधिकाऱ्यांच्या परदेशातल्या प्रवासावर बंदी

इस्राईल संरक्षण दलानं आपल्या हवाई दलातल्या अधिकाऱ्यांच्या परदेशातल्या प्रवासावर बंदी घातली आहे आणि खबरदारीचा इशारा दिला आहे. इराण आणि हिज्बुल्लाकडून प्रत्युत्तरादाखल हल्ले होण्याच्या शक्यतेमुळे इशारा देण्यात आला आहे. हवाई दलातल्या कर्मचाऱ्यांना सुट्टीसाठी परदेशात जाण्यावरची बंदी तातडीनं लागू करण्यात आल्याचं हवाई दलाचे प्रमुख तोमर बार यांनी म्हटलं आहे. देशांतर्गत स्थितीत मात्र कोणता बदल नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.