November 6, 2025 1:39 PM November 6, 2025 1:39 PM

views 19

गाझा पट्टीत हमासविरोधातली कारवाई सुरूच ठेवणार असल्याची इस्राएलची घोषणा

इस्राएलचं लष्कर गाझा पट्टीत आपल्या ताब्यातल्या प्रदेशात हमासविरोधातली  कारवाई आणि  त्यांनी बनवलेली भुयारं  नष्ट करण्याचं काम सुरूच ठेवणार असल्याचं इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी म्हटलं आहे. राफाहमध्ये अडकलेल्या हमासच्या दहशतवाद्यांना गाझामध्ये त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागात परतण्याची परवानगी द्यावी, असं आवाहन अमेरिकेनं केलं होतं. त्यानंतर काट्झ यांनी ही भूमिका जाहीर केली. गाझा पट्टीचं नि:शस्त्रीकरण करणं, तसंच मृत ओलिसांचे मृतदेह परत मिळवणं हे इस्राएलचं  उद्दिष्ट असल्याचं त्...

October 29, 2025 1:33 PM October 29, 2025 1:33 PM

views 27

इस्रायलनं गाझावर केलेल्या हल्ल्यात ३३ पॅलेस्टिनी नागरिक ठार

इस्रायलनं गाझावर आज केलेल्या हल्ल्यात किमान ३३ पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले.  हमासनं गाझात इस्राएली सैनिकांवर हल्ला केल्यावर आणि मरण पावलेल्या ओलिसांचे मृतदेह परत देण्याचं नाकारल्यावर हे पाऊल उचलल्याचं इस्राएलचे संरक्षण मंत्री इस्राएल कात्झ यांनी सांगितलं. हमासनं हे आरोप फटाळून लावले आहेत. इस्राएलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी या हल्ल्याचे आदेश सैन्याला दिले असल्याची माहिती अमेरिकेला दिली होती असं अमेरिकेच्या सूत्रांनी सांगितलं.

October 7, 2025 9:43 AM October 7, 2025 9:43 AM

views 42

इस्राइल आणि हमासच्या अधिकाऱ्यांची इजिप्तमध्ये चर्चा सुरू

गाझामधला संघर्ष थांबवण्याबाबत अमेरिकेनं तयार केलेल्या आराखड्यावर इस्राइल आणि हमासच्या अधिकाऱ्यांची इजिप्तमध्ये चर्चा सुरू आहे. पॅलेस्टाइनच्या कैद्यांची आणि इस्राइलच्या ओलिसांची मुक्तता करण्यावर या चर्चेत भर दिला जात आहे. विशिष्ट अटींची पूर्तता झाल्यावर इस्राइलच्या सर्व ओलिसांना सोडण्याची तयारी असल्याचं हमासनं म्हटलं आहे. मात्र सैन्यमाघारी आणि गाझामधल्या राजकारणातला सहभाग याबाबत हमासनं आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

October 4, 2025 10:55 AM October 4, 2025 10:55 AM

views 34

उर्वरित सर्व इस्रायली बंधकांना सोडण्यास हमासची सहमती

हमासनं उर्वरित सर्व इस्रायली बंधकांना सोडण्यास सहमती दर्शविली आहे. परंतु अमेरिकेच्या शांतता योजनेत नमूद केलेल्या अनेक प्रमुख मुद्द्यांवर पुढील वाटाघाटी करण्याची आपली इच्छा असल्याचं देखील म्हटलं आहे. एका निवेदनात, हमासनं म्हंटलं आहे की बंधकांच्या देवाण-घेवाणीसाठी योग्य अटी पूर्ण झाल्या तर अध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रस्तावात समाविष्ट असलेल्या सूत्रानुसार सर्व जिवंत आणि मृत इस्रायली कैद्यांना सोपवण्यास ते सहमत आहेत.   परंतु गाझाच्या भविष्याबद्दल आणि पॅलेस्टिनींच्या हक्कांबद्दलच्या इतर मुद्द्यांव...

September 10, 2025 11:07 AM September 10, 2025 11:07 AM

views 8

दोहा इथं काल अनेक ठिकाणी स्फोट

इस्राईली सैन्यानं कतारची राजधानी दोहा इथं काल अनेक ठिकाणी स्फोट घडवले.  आणि या हल्ल्यात प्रमुख हमास नेत्यांना लक्ष केलं अशी माहिती इस्त्रायलनं दिली.  इस्राईलच्या संरक्षण दलानं आणि इस्राईली अंतरीक सुरक्षा संस्था शिन बेट नं या हल्याची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे कतारच्या भूमीवर इस्राईलची ही पहिली लष्करी कारवाई ठरली आहे.

August 29, 2025 11:18 AM August 29, 2025 11:18 AM

views 2

इस्रायलचे राजधानी साना इथं हवाई हल्ले

इस्रायलनं येमेनची राजधानी साना इथं काल हवाई हल्ले केले. साना शहराच्या दाट लोकवस्तीच्या भागात हे हल्ले झाले. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी या हल्ल्यांना दुजोरा दिला असून हे हवाई हल्ले हुथी नेत्यांना लक्ष्य करून करण्यात आल्याचं इस्रायलच्या सरकारी माध्यमांनी सांगितलं आहे.   इस्रायली सैन्याने येमेनमधून सोडलेले दोन ड्रोन रोखल्याचे वृत्त दिल्यानंतर काही तासांतच हे हल्ले करण्यात आले. दरम्यान या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही.

August 21, 2025 1:24 PM August 21, 2025 1:24 PM

views 14

गाझा शहरावर ताबा घेण्यासाठी लष्करी कारवाई सुरु केल्याची इस्रायलची घोषणा

गाझा शहरावर ताबा घेण्यासाठी आपण पहिल्या टप्प्यातली लष्करी कारवाई सुरु केल्याचं इस्रायलच्या लष्करानं एका निवेदनाद्वारे घोषित केलं आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी काल या निर्णयाला मंजुरी दिली असून, या आठवड्याच्या अखेरीला इस्रायलच्या सुरक्षा मंत्रिमंडळाकडून त्याचा आढावा घेतला जाईल, असं यात म्हटलं आहे.   गाझावर मोठा हल्ला करण्याच्या दृष्टीनं शहराबाहेर, विशेषतः झीटौन आणि जबालिया भागात आपलं लष्कर यापूर्वीच कार्यरत झालं असून, या कारवाईसाठी ६० हजार राखीव सैनिकांना तैनात केल्याचं य...

August 7, 2025 7:02 PM August 7, 2025 7:02 PM

views 11

इजिप्तचा इस्रायलकडून नैसर्गिक वायु आयात करण्यासाठी ३५ अब्ज डॉलर्सचा करार

आखाती देशांमध्ये सुुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इजिप्तनं इस्रायलकडून नैसर्गिक वायु आयात करण्यासाठी ३५ अब्ज डॉलर्सचा करार केला आहे.  इस्रायलच्या इतिहासातला हा सर्वात मोठा आयातकरार आहे. इस्रायलच्या न्यूमेड एनर्जी कंनपीबरोबर हा करार करण्यात आला असून त्या द्वारे इजिप्त २०४० पर्यंत १३० अब्ज क्युबिक मिटर नैसर्गिक वायुची आयात करणार आहे. पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला हा पुरवठा सुरु होणार आहे.

July 24, 2025 9:47 AM July 24, 2025 9:47 AM

views 15

भारत आणि इस्रायलची द्विपक्षीय संरक्षण सहकार्य भक्कम करण्यास सहमती

भारत आणि इस्रायल यांनी दीर्घकालीन दृष्टिकोनातून द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणखी भक्कम करण्यास सहमती दर्शविली आहे. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी काल नवी दिल्ली इथं इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाचे महासंचालक मेजर जनरल अमीर बाराम यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेतली. संरक्षण मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे की संरक्षण संबंध अधिक दृढ करण्यासाठी संस्थात्मक चौकट विकसित करण्यावर बैठकीत सहमती झाली.   मेजर जनरल अमीर बाराम यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आणि दहशतवादाविरुद्धच्या भारत...

July 16, 2025 11:05 AM July 16, 2025 11:05 AM

views 7

गाझा पट्टीमध्ये मागच्या दोन दिवसात 90 हून अधिक लोक मृत्युमुखी

इस्रायली हवाई हल्ल्यात गाझा पट्टीमध्ये मागच्या दोन दिवसात 90 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले अशी माहिती गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 278 लोक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.    सोमवारच्या एका हल्ल्यात एकाच कुटुंबातील 19 जण मरण पावले, असं एका रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सिरीया मध्येही रविवारी हल्ले सुरु झाल्यापासून अंदाजे 100 जण मृत्युमुखी पडले आहेत. लेबेनॉनमध्येही इस्रायली हवाई हल्ल्यांमध्ये किमान 12 लोक ठार आणि आठ जखमी झाले  अशी माहिती लेबेनॉनच्या अधिकाऱ्य...