June 25, 2024 2:51 PM June 25, 2024 2:51 PM

views 4

६४व्या आंतरराष्ट्रीय साखर संघटनेच्या बैठकीचं अध्यक्षपद भारत भुषवणार

नवी दिल्लीत आजपासून सुरू होणाऱ्या ६४ व्या आंतरराष्ट्रीय साखर संघटनेच्या बैठकीचं अध्यक्षपद भारत भुषवणार आहे. या तीन दिवसीय बैठकीत साखर आणि जैव इंधन क्षेत्रातल्या महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. या बैठकीत ३० हून अधिक देशांचे आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. ८० हून अधिक सदस्य देश असणाऱ्या आयएसओ परिषदेनं यावर्षासाठी भारताकडे अध्यक्षपद सोपवलं आहे.

June 24, 2024 7:40 PM June 24, 2024 7:40 PM

views 2

नवी दिल्लीत उद्या आंतरराष्ट्रीय साखर संघटनेची बैठक

आयएसओ अर्थात आंतरराष्ट्रीय साखर संघटनेची बैठक उद्या नवी दिल्ली इथं होणार आहे. यात ३० पेक्षा जास्त देशांचे आणि अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या बैठकीत साखर आणि जैवइंधन आदी महत्वाच्या मुद्यांवर चर्चा होणार आहे.