August 13, 2025 10:26 AM August 13, 2025 10:26 AM

views 3

भारत सिंगापूर यांच्यातली तिसरी मंत्रीस्तरीय गोलमेज परिषद आज नवी दिल्लीत होणार

भारत सिंगापूर यांच्यातली तिसरी मंत्रीस्तरीय गोलमेज परिषद आज नवी दिल्लीत होणार आहे. केंद्रिय मंत्री डॉ. एस. जयशंकर, निर्मला सीतारामन, अश्विनी वैष्णव आणि पीयूष गोयल यामध्ये सहभागी होतील.   सिंगापूरचे उपप्रधानमंत्री आणि परराष्ट्र मंत्री बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली आहे. भारत आणि सिंगापूर यांच्यातल्या सहकार्याला नवी दिशा देण्याचं या गोलमेज परिषदांचं उद्दीष्ट असल्याचं मंत्रालयानं सांगितलं.