July 31, 2024 12:56 PM July 31, 2024 12:56 PM
16
हमासचा राजकीय प्रमुख इस्माइल हानिये यांची तेहरानमध्ये हत्या
हमासचा राजकीय प्रमुख इस्माइल हानिये याची इराणची राजधानी तेहरानमध्ये हत्या झाली. इराणचे अध्यक्ष मसौद पेझेश्कियान यांच्या शपथविधी समारंभासाठी इस्माइल हानिये तेहरानला आला असताना त्याच्या घरी एका अंगरक्षकासह त्याला ठार करण्यात आल्याची माहिती इराणच्या ‘इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कोअर’नं दिली आहे. याबद्दल अधिक तपशील देण्यात आलेले नाहीत. हानिये हा हमासचा मुख्य चेहरा होता आणि अनेक शांतता चर्चांमध्ये तो सहभागी होता.