January 11, 2025 8:58 PM January 11, 2025 8:58 PM

views 1

ISL फुटबॉलमध्ये मोहम्मदनच्या फ्लोरंट ओगियरला सामनावीर

इंडियन सुपर लीग फुटबॉलमध्ये बंगळुरू इथं झालेल्या सामन्यात मोहम्मदन एससीने बंगळुरू एफसी संघाचा १ - ० ने पराभव केला. मिरजालोल कूसिमोव्हने ८८ व्या मिनिटाला गोल डागला. मोहम्मदनच्या फ्लोरंट ओगियरला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं.   आजचा दुसरा सामना मोहन बागान आणि पूर्व बंगाल यांच्यात गुवाहाटी इथं सुरू आहे.

January 10, 2025 1:40 PM January 10, 2025 1:40 PM

views 2

ISL फुटबॉल : नॉर्थ ईस्ट युनायटेड संघाचा सामना पंजाब एफसी संघाशी होणार

गुवाहाटी इथल्या इंदिरा गांधी मैदानावर सुरू असलेल्या इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत नॉर्थ ईस्ट युनायटेड संघाचा सामना आज पंजाब एफसी संघाशी होणार आहे. हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. काल झालेल्या सामन्यात ओदिशा एफसी या संघाने चेन्नईन एफसी सोबत २-२अशी बरोबरी साधली होती.