May 17, 2025 1:21 PM May 17, 2025 1:21 PM
23
आयएसआय दहशतवादी संघटनेतल्या स्लीपर मॉड्यूल च्या 2 सदस्यांना अटक
एनआयए, अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं आयएसआय या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेच्या स्लीपर मॉड्यूल च्या दोन सदस्यांना अटक केली आहे. २०२३ साली महाराष्ट्रात पुणे इथं आयईडी ही स्फोटकं बनवणं आणि त्याची चाचणी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. एनआयए नं त्यांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली असून, ते इंडोनेशियाच्या जकार्ता इथून परतले होते. हे दोन्ही आरोपी गेली दोन वर्ष फरार होते आणि एनआयएच्या मुंबईतल्या विशेष न्यायालयानं त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंटही जारी केलं होतं. दोन्...