October 26, 2025 12:55 PM

views 46

आयर्लंडच्या दहाव्या राष्ट्राध्यक्ष म्हणून कॅथरीन कॉनोली यांची निवड

आयर्लंडच्या दहाव्या राष्ट्राध्यक्ष म्हणून कॅथरीन कॉनोली यांची निवड झाली आहे. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी हीदर हम्फ्रे यांच्या विरोधात प्रचंड मतांनी विजय मिळवला.  एक अनुभवी राजकारणी असलेल्या कॉनोली, या २०१६ साला पासून संसदेत ‘गॅलवे वेस्ट’ मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. आयर्लंड संसदेच्या उपसभापती म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. 

January 15, 2025 8:49 PM

views 11

आयर्लंडला पराभूत करत भारताचा ३-० असा मालिका विजय

महिला क्रिकेटमधे राजकोट इथं झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं आयर्लंडला ३०४ धावांनी पराभूत करत या मालिकेत ३-० असा निर्भेळ विजय मिळवला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात ५ गड्यांच्या मोेबदल्यात ४३५ धावा केल्या. सलामीवीर प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना या दोघींनी शतकं ठोकली. प्रतिकानं १५४, तर मंधानानं ८० चेंडूत १३५ धावा केल्या. या दोघींनी पहिल्या गड्यासाठी २३३ धावांची भागिदारी करत भारताच्या विजयाचा पाया रोवला. अवघ्या ७० चेंडूत स्मृतीनं आज आपलं शतक पूर्ण केलं. द...