August 13, 2024 9:44 AM
24
इराणचे उपाध्यक्ष मोहंमद जावेद झरीफ यांचा नियुक्तीनंतर अकराच दिवसांनी पदाचा राजीनामा
इराणचे उपाध्यक्ष मोहंमद जावेद झरीफ यांनी नियुक्तीनंतर अकराच दिवसांनी पदाचा राजीनामा दिला आहे. समाजमाध्यमांवर झऱीफ यांनी निर्णय जाहीर केला आहे. नवीन मंत्रिमंडळाच्या निवडीसाठीच्या समितीचे प्रमुख म्हणून आपण कामात समाधानी नसल्याचं कारण त्यांनी दिलं आहे. संभाव्य मंत्रिमंडळातील 19 सदस्यांपैकी किमान सात आपल्या पसंतीचे नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अध्यक्ष मोहंमद मसूद पेझेश्कियन यांच्यावर आपण नाखूश आहोत असं मात्र नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. पेझेश्कियन यांच्यावर आपला पूर्ण विश्वास असून, नागरिकांनी त...