May 22, 2025 2:51 PM
20
अमेरिका – इराणमधली चर्चेची पाचवी फेरी उद्या होणार
अमेरिका आणि इराण मधली चर्चेची पाचवी फेरी उद्या होणार आहे. ओमानचे परराष्ट्र मंत्री सय्यद बद्र बिन हमाद बिन हमुद अल्बुसैदी यांनी ही घोषणा केली. इराणच्या अणू कार्यक्रमावर अमेरिकेनं लागू केलेले निर्बंध हटवण्याबाबत चर्चेच्या या फेऱ्या सुरु आहेत. अमेरिकेकडून होत असलेल्या अवाजवी मागण्यांमुळे या चर्चेत सहभागी होण्याबाबतचा निर्णय इराणनं अजूनही राखून ठेवल्याचं इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अरघची यांनी काल सांगितलं. आपल्या अणु कार्यक्रमाबाबत पारदर्शकता राखण्याची इराणची तयारी आहे, मात्र अमेरिकेकडून न...