June 21, 2025 2:39 PM June 21, 2025 2:39 PM

views 13

इस्राएलचा हल्ला सुरु असेपर्यंत भविष्यातल्या अणु कार्यक्रमाबद्दल चर्चा करणार नाही – इराण

इस्राएलचा हल्ला सुरु असेपर्यंत आपण भविष्यातल्या आपल्या अणु कार्यक्रमाबद्दल चर्चा करणार नसल्याचं नं म्हटलं आहे.    इराणच्या अणु कार्यक्रमाबद्दल चर्चा करण्यासाठी फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी आणि युरोपियन युनियनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी काल जिनिव्हा मध्ये  इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर इराणनं आपली भूमिका स्पष्ट केली.      दरम्यान, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी सुरक्षा परिषदेला संबोधित केलं  आणि इराण-इस्राएल दरम्यानचा तणाव तातडीनं कमी करण्याची विनंती केली...

June 13, 2025 8:27 PM June 13, 2025 8:27 PM

views 7

इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह खोमिनी यांनी केली नव्या लष्करी अधिकाऱ्यांच्या नेमणूका

इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यांमधे, संरक्षण विभागातले महत्वाचे अधिकारी मारले गेल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह खोमिनी यांनी आज नव्या लष्करी अधिकाऱ्यांच्या नेमणूका केल्या. त्यानुसार सशस्त्र दलांचे नवे प्रमुख म्हणून अब्दुल रहीम मौसवी काम करतील. महंमद पकपौर इस्लामिक रिव्होल्यूशनेरी गार्ड कोअरचे नवे कमांडर असतील, तर खतम अल अन्बियाच्या केंद्रीय मुख्यालयाची सूत्रं अली शादमनी यांच्याकडे असतील.     इराणवर काल रात्रभर केलेल्या हल्ल्यांमधे त्यांचे तीन वरिष्ठ लष्करी अधिकारी मारले गेल्याचा द...

June 13, 2025 1:51 PM June 13, 2025 1:51 PM

views 5

इराणच्या अण्वस्त्र तळांवर इस्राएलचे हल्ले/ पश्चिम आशियात तणाव वाढला

इस्राएलने काल इराणच्या भूभागावर हल्ले केले त्यामुळे पश्चिम आशियात पुन्हा संघर्षाचे ढग जमले आहेत. इराणवरची ऑपरेशन रायझिंग लायन ही कारवाई आणखी काही दिवस चालू राहील, असं इसराएलचे प्रधानमंत्री बेन्यामिन नेतान्याहू यांनी म्हटलं असून इसराएलमधे आणीबाणी जाहीर केली आहे. नातांझ या इराणचा अण्वस्त्र तळावर हल्ला करुन इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचा बीमोड केल्याचा दावा इसराएलनं केला आहे. इराणच्या इस्लामिक रेव्हल्यूशनरी गार्डचे प्रमुख जनरल होस्सेन सलामी इराणचे लष्कर प्रमुख, मोहम्मद बाघेरी आणि अणुउर्जा संस्थेचे...

May 23, 2025 7:24 PM May 23, 2025 7:24 PM

views 7

अमेरिका-इराण अण्वस्त्र विषयक चर्चेची पाचवी फेरी सुरू

अमेरिका आणि इराण दरम्यान सुरु असलेल्या अण्वस्त्र विषयक चर्चेची पाचवी फेरी आज इटलीतल्या रोममध्ये सुरु झाली आहे.  यापूर्वी लादलेले आर्थिक निर्बंध शिथिल करण्याच्या मोबदल्यात इराणच्या अण्वस्त्र विषयक उपक्रमाला आळा घालण्याचा अमेरिकेचा उद्देश आहे. मात्र यापूर्वी झालेल्या चर्चेच्या चौथ्या फेरीदरम्यान इराणनं आपला युरेनियम संवर्धनाचा उपक्रम स्थगित करायला स्पष्ट नकार दिला होता. अमेरिकेनं  चर्चेच्या पाचव्या फेरीत पुन्हा हीच मागणी लावून धरली,  तर इराण ही मागणी पुन्हा एकदा फेटाळून लावेल, असं इराणचे परराष्ट्र...

May 22, 2025 2:51 PM May 22, 2025 2:51 PM

views 12

अमेरिका – इराणमधली चर्चेची पाचवी फेरी उद्या होणार

अमेरिका आणि इराण मधली चर्चेची पाचवी फेरी उद्या होणार आहे. ओमानचे परराष्ट्र मंत्री सय्यद बद्र बिन हमाद बिन हमुद अल्बुसैदी यांनी ही घोषणा केली. इराणच्या अणू कार्यक्रमावर अमेरिकेनं लागू केलेले निर्बंध हटवण्याबाबत चर्चेच्या या फेऱ्या सुरु आहेत. अमेरिकेकडून होत असलेल्या अवाजवी मागण्यांमुळे या चर्चेत सहभागी होण्याबाबतचा निर्णय इराणनं  अजूनही राखून ठेवल्याचं इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अरघची यांनी काल सांगितलं. आपल्या अणु कार्यक्रमाबाबत पारदर्शकता राखण्याची इराणची तयारी आहे, मात्र अमेरिकेकडून न...

May 11, 2025 2:55 PM May 11, 2025 2:55 PM

views 8

अण्वस्त्र विषयक हक्कांच्या मागणीपासून मागे हटणार नसल्याचं इराणचं स्पष्टीकरण

अमेरिकेबरोबर वाटाघाटी करताना इराण आपल्या अण्वस्त्र विषयक हक्कांच्या मागणीपासून मागे हटणार नसल्याचं इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरघाची यांनी स्पष्ट केलं आहे. अमेरिका आणि इराणमध्ये आज ओमान इथे होणाऱ्या अणुविषयक चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरघाची यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. इराण अमेरिकेसह इतर देशांशीही या संबंधी चर्चा करत असल्याचं अरघाची यांनी स्पष्ट केलं आहे. 

April 22, 2025 11:35 AM April 22, 2025 11:35 AM

views 33

इराणसोबत व्यापक धोरणात्मक भागीदारीला रशियाची मान्यता

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इराणसोबत व्यापक धोरणात्मक भागीदारीला मान्यता देणाऱ्या कायद्यावर स्वाक्षरी केली आहे. 17 जानेवारी रोजी रशियामध्ये व्लादिमीर पुतिन आणि इराणी अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्यात झालेल्या शिखर परिषदेत सुरुवातीला या करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती, ज्यामध्ये उभय नेत्यांनी व्यापार, संरक्षण, ऊर्जा आणि प्रादेशिक पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये सहकार्य करण्याचं मान्य केलं होतं.

April 11, 2025 2:50 PM April 11, 2025 2:50 PM

views 685

ईराणनच्या आण्विक धोरणाबाबत अमेरिका त्यांच्याशी थेट चर्चा करणार

ईराणनं जाहीर केलेल्या आण्विक धोरणाबाबत अमेरिका  त्यांच्याशी थेट चर्चा करणार असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी आज सांगितलं. ही चर्चा उद्या ओमान इथं होणार असून त्यासाठी दोन्ही देशांची शिष्टमंडळं उद्या दुपारी मस्कतमध्ये दाखल होतील.

March 31, 2025 8:00 PM March 31, 2025 8:00 PM

views 15

अमेरिकेसोबतच्या अणुकराराला इराणचा नकार

इराणच्या अणुकार्यक्रमाविषयी चर्चा करण्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्म्प यांचा प्रस्ताव इराणने नाकारला आहे. ट्रम्प यांनी २०१८ मधे अणुकराराविषयीच्या चर्चेतून माघार घेतल्यानंतर ही चर्चा पुुढे सरकू शकली नाही.  ट्रम्प यांनी इराणवर नव्याने निर्बंध लादणार असल्याचं सांगितलं आहे. इराणवर लष्करी कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.  तर इराण प्रत्येक हल्ल्या चोख उत्तर देईल असं इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खोमेनी यांनी म्हटलं आहे. 

March 30, 2025 8:45 PM March 30, 2025 8:45 PM

views 16

इराणच्या आण्विक कार्यक्रमाबद्दल अमेरीकेशी थेट वाटाघाटीला इराणचा नकार

इराणच्या आण्विक कार्यक्रमाबद्दल अमेरीकेशी थेट वाटाघाटीला इराणने नकार दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी इराणला पाठवलेल्या पत्राला ओमान सल्तनतच्या माध्यमातून उत्तर देताना इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कन यांनी या वाटाघाटीत मध्यस्थ असण्याला मात्र संमती दर्शवली आहे. इराणने अण्विक अस्त्र मिळवणे इस्रायल आणि अमेरिकेला मान्य असणार नाही असं ट्रंप यांनी एका मुलाखतीत नमूद केलं होत. इराणच्या तेहरान आण्विक करारातून अमेरिकेने २०१८ मध्ये  एकतर्फी अंग काढून घेतले होते. त्यानंतर या वाटाघाटी थांबल्या होत...