June 24, 2025 9:43 AM June 24, 2025 9:43 AM

views 3

इराणचा कतारमधील अल उदेद हवाई तळावर क्षेपणास्त्र हल्ला

इराणनं कतारमधील अल उदेद हवाई तळावर क्षेपणास्त्र हल्ला केला. हा अमेरिकेचा पश्चिम आशियातील सर्वांत मोठा लष्करी तळ आहे. इराकमधील ऐन अल-असद तळावरदेखील इराणनं हल्ला केल्याचं वृत्त आहे.   कतारमधील अमेरिकेचा हवाईतळ सावधगिरीचा उपाय म्हणून आधीच रिकामा करण्यात आला होता आणि त्यांच्या हवाई संरक्षण प्रणालींनी येणाऱ्या क्षेपणास्त्रांना यशस्वीरित्या रोखल्यानं या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, असं कतार आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.   या संकटामुळे विमान वाहतुकीवर परिणाम झाला असून, एअर...

June 24, 2025 9:49 AM June 24, 2025 9:49 AM

views 4

तेलाच्या किमतींमध्ये ५ वर्षांतील सर्वांत मोठी घसरण

कतारमधील अल उदेद अमेरिकन हवाई तळावर इराणनं केलेल्या हल्ल्यानंतर जागतिक पातळीवर तेलाच्या किमतींमध्ये पाच वर्षांतील सर्वांत मोठी एका दिवसातील घसरण नोंदवली गेली. तेलाच्या किमती प्रति बॅरल पाच डॉलर्सने घसरल्या. ऊर्जा पायाभूत सुविधांना थेट धोका नसल्यामुळे तेल पुरवठा खंडित होण्याची शक्यता कमी असल्याची खात्री पटल्यानं व्यापाऱ्यांनी आठवड्याच्या शेवटी तेलाची विक्री केल्यानं किमतीत मोठी घसरण झाली.