June 19, 2025 12:50 PM June 19, 2025 12:50 PM

views 14

ऑपरेशन सिंधू : उत्तर इराणमधून ११० विद्यार्थ्यांना घेऊन आलेलं विमान नवी दिल्लीत दाखल

ऑपरेशन सिंधू मोहिमेअंतर्गत उत्तर इराणमधून ११० विद्यार्थ्यांना घेऊन आलेलं विमान आज पहाटे नवी दिल्लीत दाखल झालं. इस्रायल आणि इराणमध्ये वाढत असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतानं आपल्या नागरिकांना इराणमधून परत आणण्यासाठी ऑपरेशन सिंधू ही मोहीम आखली आहे.   पहिल्या टप्प्यात ११० विद्यार्थ्यांना इराणमधून येरेवान या अर्मेनियाच्या राजधानीत आणण्यात आलं आणि तिथून काल दुपारी विमानानं विद्यार्थी भारताकडे परत आले. भारत इराण आणि अर्मेनिया सरकारचा ऋणी असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हट...

June 18, 2025 8:39 PM June 18, 2025 8:39 PM

views 14

इस्राइल विरुद्धच्या युद्धात माघार घेण्याचं अमेरिकेचं आवाहन इराणनं फेटाळलं

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचं अमेरिकेचं आवाहन इराणनं फेटाळलं आहे. इराण शरणागती पत्करणार नाही. अमेरिकेनं इराणवर हल्ला केला तर, त्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांनी दिला आहे. युद्ध सुरू झालं असून इस्रायलला कोणतीही दया न दाखवता कठोर प्रत्युत्तर द्यावं लागेल, असा इशारा त्यांनी दिला.   या संघर्षाच्या सहाव्या दिवशी इराणमधल्या सेंट्रीफ्यूज आणि शस्त्रास्त्र उत्पादन कारखान्यांवर हल्ले केल्याचा दावा इस्रायलनं केला आहे...

June 18, 2025 6:42 PM June 18, 2025 6:42 PM

views 19

इराणमधल्या सेंट्रीफ्यूज आणि शस्त्रास्त्र उत्पादन कारखान्यांवर हल्ले केल्याचा इस्रायलचा दावा

इस्रायल आणि इराण यांच्यातला संघर्ष आज सहाव्या दिवशीही सुरुच असून इराणमधल्या सेंट्रीफ्यूज आणि शस्त्रास्त्र उत्पादन कारखान्यांवर हल्ले केल्याचा दावा इस्रायलनं केला आहे. इराणनं इस्रायलवर आणखी क्षेपणास्त्रं डागल्यानंतर हे हल्ले केले, त्यात हवाई दलाच्या ५० हून अधिक लढाऊ विमानांनी भाग घेतला, असं इस्रायलच्या संरक्षण दलांनी म्हटलं आहे. आयएईए, अर्थात आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीनं याला दुजोरा दिला आहे. युद्ध सुरू झालं असून इस्रायलला कोणतीही दया न दाखवता कठोर प्रत्युत्तर द्यावं लागेल, असा इशारा इराणचे सर...

June 17, 2025 2:33 PM June 17, 2025 2:33 PM

views 12

Iran-Israel War : भारतीयांच्या मदतीसाठी २४ तास सुरू नियंत्रण कक्षाची स्थापन

इराण आणि इस्रायलमधे सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी २४ तास सुरू असलेला एक नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. तसंच, मदतीसाठी संपर्क क्रमांकही दिले आहेत. ज्या भारतीय नागरिकांना मदतीची आवश्यकता असेल त्यांनी १८०० ११८ ७९७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन परराष्ट्र मंत्रालयाने केलं आहे. इराणमध्ये राहणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी भारतीय दुतावासाकडून आपत्कालीन हेल्पलाईन सक्रिय करण...

June 17, 2025 1:44 PM June 17, 2025 1:44 PM

views 11

अमेरिकन नागरिकांनी तात्काळ इराणमधून बाहेर पडण्याचे निर्देश

इस्राईल आणि इराण यांच्यातला संघर्ष वाढत असून दोन्ही देश एकमेकांच्या पायाभूत सुविधा केंद्र आणि रहिवासी वस्त्यांवर हल्ले करत असल्याने संघर्षाची तीव्रता वाढत आहे. अमेरिकेच्या नागरिकांनी तात्काळ इराणमधून बाहेर पडावं असं त्यांनी सांगितलं आहे.  दरम्यान, इराणनं इस्राइलबरोबरचा संघर्ष थांबवावा आणि अणु कार्यक्रमाच्या मुद्दयावर चर्चा करावी असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दोन्ही देशांच्या संघर्षात इस्राइलला कुठलीही प्रत्यक्ष मदत करणार नसल्याचं राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्ट...

June 17, 2025 1:34 PM June 17, 2025 1:34 PM

views 18

पश्चिम आशियातल्या तणावाला इराण जबाबदार असल्याचा G7 देशांचा दावा

पश्चिम आशियातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, G7 देशांच्या नेत्यांनी आज इस्राएल आणि इराण दरम्यानच्या वाढत्या संघर्षाला संबोधित करणारं एक संयुक्त निवेदन जारी केलं. G7 च्या नेत्यांनी पश्चिम आशियातली शांतता आणि स्थैर्यासाठी वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला असून, इस्राएलच्या स्वसंरक्षणाच्या हक्काला पाठिंबा दर्शवला आहे. संघर्षमय परिस्थितीत नागरिकांचं संरक्षण महत्त्वाचं असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे.    या प्रदेशात अस्थिरता आणि दहशतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी  इराण जबाबदार असून, इराणने ...

June 14, 2025 1:25 PM June 14, 2025 1:25 PM

views 11

इराणमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन

इस्रायल - इराणमध्ये संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, इराणमध्ये असलेल्या भारतीय नागरिक तसंच भारतीय वंशाच्या व्यक्तींनी मदतीसाठी तिथल्या भारतीय दूतावासाच्या आपत्कालीन संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं केलं आहे. यासाठी मंत्रालयानं +98 9128109115 आणि +98 9128109109 हे संपर्क क्रमांकही जारी केले आहेत.    यासोबतच इराणमधल्या भारतीय तसंच भारतीय वंशाच्या नारिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, भारतीय दूतावासाने समाजमाध्यमांवर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचं पालन करावं, तसंच स्था...