June 24, 2025 1:22 PM June 24, 2025 1:22 PM

views 5

इराण बरोबरच्या युद्धबंदीला इस्रायलची सहमती

इराण बरोबरच्या युद्धबंदीला अखेर इस्रायलने सहमती दिली आहे.  इराणने कतारमध्ये असलेल्या अमेरिकेच्या तळावर क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर काही तासांतच अमेरिकेने ही घोषणा केली. मात्र आतापर्यंत इस्रायलने त्याबाबत अधिकृत घोषणा केली नव्हती. इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमामुळे निर्माण झालेल्या धोक्याला आळा घालण्याचं उद्दिष्ट साध्य झालं असून भविष्यात या युद्धबंदीच्या कराराचं उल्लंघन झाल्यास इस्रायल ते सहन करणार नाही, असं इस्रायल सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान...

June 24, 2025 9:34 AM June 24, 2025 9:34 AM

views 6

इराण – इस्त्रायलची युद्धबंदीसाठी सहमती झाल्याचा अमेरिकेचा दावा इराणनं फेटाळला

इराण आणि इस्रायलनं संपूर्ण युद्धबंदीबाबत सहमती दर्शविली असून, येत्या काही तासांत ती लागू होईल, अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल रात्री केली. कतारमधील अमेरिकेच्या हवाई तळावर इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर काही वेळातच ही घोषणा करण्यात आली. युद्धबंदी टप्प्याटप्प्याने लागू केली जाईल. इराण युद्धबंदी सुरू करेल, त्यानंतर इस्रायल 12 व्या तासाला युद्धबंदी करेल आणि त्यानंतर 12 दिवसांच्या युद्धाची अधिकृत समाप्ती होईल, असं ट्रम्प यांनी निवेदनात म्हटलं आहे.   दरम्यान, इराणचे परराष्ट्...

June 23, 2025 3:02 PM June 23, 2025 3:02 PM

views 5

मध्य आणि दक्षिण इस्रायलमध्ये हवाई हल्ला सायरन सक्रिय

इराणकडून क्षेपणास्त्र हल्ल्याचा धोका असल्यानं इस्रायलच्या लष्करानं मध्य आणि दक्षिण इस्रायलमध्ये हवाई हल्ला सायरन सक्रिय केले आहेत. जेरुसलेमच्या आकाशात आज काही क्षेपणास्त्र दिसल्याचं एका खाजगी वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.   गेल्या दहा दिवसांत, मध्य इस्रायलमध्ये मोठं नुकसान झाले आहे, उत्तरेकडील बंदर शहर हैफा इथंही वारंवार हल्ले झाले आहेत. इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या संघर्षामुळे व्यापक प्रादेशिक युद्धाची भीती निर्माण झाली आहे. संकट कमी करण्यासाठी मॉस्कोमध्ये उच्चस्तरीय चर्चा सुरू असल्याचं ...

June 23, 2025 2:47 PM June 23, 2025 2:47 PM

views 5

तेल वाहतूकीसाठी वापरांत येणारी होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव इराणच्या संसदेत मंजूर

इराण आणि इस्रायलमध्ये अद्याप संघर्ष सुरु आहे. अमेरिकेनं काल इराणवर हल्ला केल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी इस्रायलवर हल्ले सुरु ठेवणार असल्याचं म्हटलं आहे. इस्रायलनं मोठी चूक केली असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.   इराणच्या संसदेनं फोर्डो, नटान्झ आणि इस्फहान इथल्या इराणी अणुआस्थापनांवर अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर जगातील सर्वात महत्त्वाचा तेल आणि वायू वाहतूक मार्ग असलेल्या होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव एकमता...

June 22, 2025 1:47 PM June 22, 2025 1:47 PM

views 15

इस्रायलने केलं अमेरिकेच्या कारवाईचं स्वागत, संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली चिंता

इराणच्या अण्वस्त्र तळांवर हल्ला करण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाबद्दल इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं अभिनंदन केलं आहे. नेतन्याहू यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून ट्रम्प यांचं कौतुक केलं.    दरम्यान, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी अमेरिकेच्या इराणवरच्या हल्ल्यांमुळे पश्चिम आशियातला संघर्ष नियंत्रणाबाहेर जाऊ शकतो, असा इशारा दिला आहे. अमेरिकेचे हल्ले हा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी एक मोठा धोका असल्याचं गुटेरस या...

June 22, 2025 1:34 PM June 22, 2025 1:34 PM

views 14

इस्रायली लष्कराचं पश्चिम इराणमधल्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले

वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायली लष्करानं पश्चिम इराणमधल्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. इस्रायली सीमेनजीक इराणच्या हल्ल्यासाठी सज्ज असलेल्या क्षेपणास्त्र प्रक्षेपकांवर तसंच इराणच्या सशस्त्र दलातल्या सैनिकांवर हल्ले केल्याची माहिती इस्रायलच्या संरक्षण दलांनी आपल्या समाज माध्यमावर दिली आहे.

June 22, 2025 1:25 PM June 22, 2025 1:25 PM

views 6

इराणच्या ३ अणुप्रकल्पांवर अमेरिकेचा हल्ला

इराण-इस्रायल संघर्षात आता अमेरिकेनं जाहीररीत्या उडी घेतली आहे. अमेरिकेनं इराणच्या तीन आण्विक तळांवर हल्ला केला असून, हा हल्ला केल्यानंतर अमेरिकेची सर्व विमानं इराणी हवाई हद्दीबाहेर आहेत, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमध्यमावरील संदेशातून जाहीर केलं आहे. इतर कोणताही पर्याय शिल्लक राहिला नसल्यानं अमेरिकेने नाईलाजास्तव ही कारवाई केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर इराणने आता शांतता प्रस्थापित करावी असं आवाहनही ट्रंप यांनी केलं आहे.