June 24, 2025 8:00 PM June 24, 2025 8:00 PM

views 3

युद्धबंदीनंतर इराणनं क्षेपणास्त्रं डागल्याचा इस्रायलच्या संरक्षण दलांचा दावा, इराणचा इन्कार

इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदी जाहीर झाली असूनही इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रं डागल्याचा दावा इस्रायलच्या संरक्षण दलांनी केला आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी इराणवर युद्धबंदीचं उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. तर, इराणच्या सशस्त्र दलांनी इस्रायलचा हा दावा फेटाळून लावला आहे.    इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमामुळे निर्माण झालेल्या धोक्याला आळा घालण्याचं उद्दिष्ट साध्य झालं असून भविष्यात या युद्धबंदीच्या कराराचं उल्लंघन झाल्यास इस्रायल ते सहन करणार नाही, असं इस्रायल सरकारने यु...

June 24, 2025 7:46 PM June 24, 2025 7:46 PM

views 5

इराण आणि इस्रायलमधे झालेल्या शस्त्रसंधीचं भारताकडून स्वागत

इराण आणि इस्रायलमधे झालेल्या शस्त्रसंधीचं भारताने स्वागत केलं आहे. पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाला चर्चेशिवाय पर्याय नाही असं भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या  देशांनी शांतता आणि स्थैर्यासाठी प्रयत्न करावेत, यात भारत आपली भूमिका निभावण्यासाठी तयार आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे.