April 28, 2025 11:47 AM April 28, 2025 11:47 AM

views 5

शाहीद राजाई बंदरात झालेल्या स्फोटात मरण पावलेल्यांची संख्या ४० वर

इराणच्या दक्षिणेकडील बंदरअब्बास या शहरानजीकच्या शाहीद राजाई बंदरात झालेल्या शक्तिशाली स्फोटात मरण पावलेल्यांची संख्या आता ४० झाली आहे. शनिवारी झालेल्या या स्फोटानंतर लागलेल्या आगीत एक हजाराहून अधिक जण जखमी झाले आहेत.   त्यापैकी १९७ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या स्फोटाचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. दरम्यान या स्फोटात झालेल्या जीवितहानीबद्दल इराण सरकारनं आज एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे.