January 17, 2026 1:49 PM

views 15

इराणमधले भारतीय नागरिक मायदेशी परतले

इराणमधल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय नागरिक काल भारतात परतले. भारतीय नागरिकांनी इराण सोडावं, असं आवाहन सरकारने केलं होतं, त्या पार्श्वभूमीवर इराणमधून भारतीयांनी परतायला सुरुवात केली आहे. भारत सरकार इराणमधल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून भारतीय नागरिकांच्या  सुरक्षिततेसाठी सरकार वचनबद्ध आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटलं आहे.

January 17, 2026 12:40 PM

views 19

Iran: सरकारने केलेल्या कारवाईत आतापर्यंत ३ हजार ९० जण मृत्युमुखी

इराणमधे सरकारविरोधी निदर्शनांवर सरकारने केलेल्या कारवाईत आतापर्यंत ३ हजार ९० जण मृत्युमुखी पडले आहेत. सध्या तेहरानमधल्या बाजारपेठा खुल्या झाल्या असल्या तरी इंटरनेट अजूनही बंद आहे. इराणचे निर्वासित युवराज रेजा पहलवी  यांनी नागरिकांना आंदोलन सुरू ठेवण्याचं आवाहन केलं आहे. इराणमधलं सरकार उलथून पाडलं तर आपण देशात परत येऊ असंही ते म्हणाले. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आंदोलकांना मृत्यूदंड दिला  जाईल, असं अयातुल्लाह अहमद खतामी यांनी सांगितलं आहे. देशातल्या आर्थिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर २८ डिसेंबरप...

January 13, 2026 7:50 PM

views 13

अमेरिकेच्या कारवाईचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचं इराणचं प्रत्युत्तर

इराण अमेरिकेच्या कारवाईचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचं इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागाजी यांनी म्हटलं आहे. गेल्यावर्षी जून महिन्यात अमेरिकेने इराणवर केलेल्या लष्करी हल्ल्यापेक्षा यावेळी इराण अधिक सुसज्ज आहे, असं त्यांनी सांगितलं. आर्थिक अस्थैर्याच्या पार्श्वभूमीवर इराणमधे सध्या सरकारविरोधी निदर्शनं तीव्र झाली असून सरकार निदर्शकांवर बळाचा वापर करत आहे. यात आतापर्यंत दोन  हजार जण मृत्युमुखी पडल्याचं सांगितलं जात आहे. 

January 11, 2026 7:57 PM

views 21

इराणमध्ये सुरू असलेल्या देशव्यापी सरकारविरोधी निदर्शनांना आज चौदा दिवस पूर्ण

इराणमध्ये सुरू असलेल्या देशव्यापी सरकारविरोधी निदर्शनांना आज चौदा दिवस पूर्ण झाले असून, या हिंसाचारातल्या मृतांची संख्या आता 116 वर पोहोचली आहे. इंटरनेट आणि फोन सेवा खंडित असूनही निदर्शनं सुरूच आहेत अशी माहिती, अमेरिकेतल्या मानवाधिकार संघटनांनी दिली आहे. आतापर्यंत २,६०० हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. इराणमधल्या या आंदोलनांना पाठिंबा देण्यासाठी युरोपातल्या अनेक शहरांमध्येही आज मोठ्या फेऱ्या काढण्यात आल्या.

January 11, 2026 11:17 AM

views 34

इराणमध्ये सरकारविरोधी निदर्शनं तीव्र

इराणमध्ये सरकारविरोधी निदर्शने तीव्र झाली आहेत. इराणमधील या अशांत परिस्थितीला दहशतवादीच जवाबदार असल्याचं इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने म्हटलं आहे. इराणमध्ये सध्या इंटरनेट बंद असून तिथल्या सध्याच्या परिस्थितीबाबत माहिती मिळणं अवघड होत आहे. तेहरानसह रश्त, तब्रीझ, शिराझ, केरमानमध्ये महागाईच्या विरोधात सुरू झालेल्या या आंदोलनांने राजकीय स्वरूप घेतलं आहे. किमान ५० आंदोलक तर १५ सुरक्षा कर्मचारी यामध्ये ठार झाले असून २ हजार ३ शे जणांना अटक झाल्याचे एचआरएएनएने सांगितलं. २८ डिसेंबरपासून संपूर्ण इराणम...

January 9, 2026 1:25 PM

views 23

इराणमधल्या ३१ प्रांतांमध्ये १३ दिवसांची इंटरनेट बंदी

इराणमधे सुरू असलेल्या सरकारविरोधी निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर इराणमधल्या ३१ प्रांतांमधे १३ दिवसांची इंटरनेट बंदी करण्यात आली आहे. यामुळे देशभरातली मोबाईल सेवादेखील विस्कळीत झाली आहे. २८ डिसेंबरला सुरू झालेल्या निदर्शनांमुळे माजलेल्या अराजकतेमुळे आतापर्यंत ४५ जणांचा मृत्यू झाला असून २०० पेक्षा जास्त जणांना अटक करण्यात आली आहे.  अनेक ठिकाणी निदर्शकांनी रस्ते अडवले असून सरकारविरोधी घोषणाबाजी सुरू आहे.  

November 3, 2025 7:32 PM

views 22

इराणची आठ नवीन अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची घोषणा 

स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा उत्पादन वाढवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून इराणने रशियाच्या मदतीने आठ नवीन अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याची घोषणा  केली आहे. इराणच्या अणुऊर्जा संघटनेचे प्रमुख मोहम्मद इस्लामी यांनी ही माहिती दिली. बुशेहरमध्ये चार आणि त्याच्या उत्तर आणि दक्षिण किनारपट्टीवर चार अणुऊर्जा प्रकल्प बांधले जातील. उत्तर गोलेस्तान प्रांतात बांधकाम आधीच सुरू झालं आहे, तर खुजेस्तान प्रांतातला अपूर्ण अणुऊर्जा प्रकल्प देखील पूर्ण केला जाईल, असंही त्यांनी सांगितलं. देशाची अणुऊर्जा निर्मिती २० हजार मेगाव...

September 28, 2025 2:02 PM

views 26

२०१५मधला अणु करार पुनरुज्जीवित करण्यात अमेरिका अडथळे आणत असल्याचा इराणचा आरोप

२०१५मधला अणु करार पुनरुज्जीवित करण्यात अमेरिका अडथळे आणत असल्याचा आरोप इराणने केला आहे. इराणच्या अणुप्रकल्पांना आळा घालण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून २०१५ मधे अमेरिकेने या कराराचा मसुदा तयार केला होता. मात्र अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी तो फेटाळला असून फ्रान्स ब्रिटन आणि जर्मनीने पर्यायी योजना आखली आहे. एकीकडे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीबरोबर सहकार्य करण्याची आपली तयारी असल्याचं इराणचे अध्यक्ष मसऊद पेझेश्कियान यांनी सांगितलं आहे.

September 25, 2025 1:41 PM

views 25

अण्वस्त्र बनवण्याचा किंवा विकत घेण्याचा कोणताही इरादा नसल्याचं इराणचं स्पष्टीकरण

अण्वस्त्र बनवण्याचा किंवा विकत घेण्याचा इराणचा कोणताही इरादा नसल्यामुळे ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीने संयुक्त राष्ट्रांमार्फत इराणवर निर्बंध लावण्याचा केलेला प्रयत्न गैरलागू  असल्याचं मत इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकीयन यांनी व्यक्त केलं आहे.    याआधी पेझेशकीयन आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांची अण्वस्त्रविषयक चर्चा झाली होती आणि त्यात पेझेशकीयन यांनी इराणचा अण्वस्त्रसज्जतेचा विचार नसल्याचं अधोरेखित केलं होत, तसेच युरोपियन देशांशी या संबंधात बोलणी करण्याची तयारी दर्शवली...

June 27, 2025 1:57 PM

views 26

ऑपरेशन सिंधू अंतर्गत, इराणमधून १७३ भारतीय नागरिक मायदेशी परतले

ऑपरेशन सिंधू अंतर्गत, इराणमधून १७३ भारतीय नागरिकांना घेऊन एक विशेष विमान रात्री उशिरा नवी दिल्लीत पोहोचलं. आतापर्यंत १९ विशेष उड्डाणांद्वारे एकूण ४ हजार ४१५ भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यात आलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एका सामाजिक माध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली. इराणमधून मायदेशी परतलेल्या ३ हजार ५९७ आणि इस्रायलमधून आलेल्या ८१८ व्यक्तींचा यात समावेश असल्याचं जयस्वाल यांनी सांगितलं. भारतीय नागरिकांव्यतिरिक्त ९ नेपाळी, ४ श्रीलंकेचे आणि एका भारतीय नागरिकाच्या इर...