August 22, 2024 7:55 PM August 22, 2024 7:55 PM
9
राज्याच्या गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदी इक्बाल सिंह चहल
मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल यांची राज्याच्या गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदी बदली करण्यात आली आहे. चहल यांनी सध्याच्या पदाचा कार्यभार अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून, नवीन पदाचा कार्यभार मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून त्वरीत स्वीकारण्याचे निर्देश नियुक्ती संदर्भातल्या आदेशात देण्यात आले आहेत. इक्बाल सिंह चहल यांच्याकडच्या खनिकर्म, उद्योग आणि ऊर्जा विभागाचा अतिरिक्त मुख्य सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेशापर्यंत कायम ठेवण्यात आला आहे.