April 5, 2025 8:44 AM April 5, 2025 8:44 AM

views 12

आयपीएल – लखनऊ सुपर जायंटस् संघाचा मुंबई इंडियन्स संघावर 12 धावांनी विजय

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल लखनऊ सुपर जायंटस् संघानं मुंबई इंडियन्स संघावर 12 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना लखनऊच्या संघानं 20 षटकांत 8 गडी बाद 203 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना मुंबईच्या संघाला 5 गडी बाद 191 धावा करता आल्या.

April 1, 2025 9:05 AM April 1, 2025 9:05 AM

views 8

मुंबई इंडियन्स संघाचा कोलकाता नाइट रायडर्सवर दणदणीत विजय

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघानं कोलकाता नाइट रायडर्सवर 8 गडी आणि 43 चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला. त्यापूर्वी मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आणि कोलकाता नाइट रायडर्स संघाला 17 व्या षटकात ११६ धावांवर सर्वबाद केलं. 117 धावांच हे लक्ष्य मुंबईने केवळ दोन गड्याच्या मोबदल्यात १3व्या षटकातच पूर्ण केल. रायन रुकेलटन यांनं ४१ चेंडूत ६२ धावा तर सुर्यकुमार यादवनं ९ चेंडूत २७ धावा करत विजयी भागिदारी केली. आज लखनौ स...

March 8, 2025 3:10 PM March 8, 2025 3:10 PM

views 12

IPL : गुजरात जायंटस संघाचा दिल्ली कॅपिटल्सवर ५ गडी राखून पराभव

महिला प्रीमियर लीग क्रिकेट मध्ये काल लखनौ इथं झालेल्या सामन्यात गुजरात जायंटस संघानं दिल्ली कॅपिटल्स संघाचा ५ गडी राखून पराभव केला. दिल्ली कॅपिटल्सनं दिलेल्या १७८ धावांचं आव्हान गुजरात जायंटसनं ३ चेंडू शिल्लक असताना पूर्ण केलं.  या विजयामुळे  गुजरात जायंट्स संघ ७ सामन्यांतून ८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्सच्या खात्यात ८ सामन्यातून मिळालेले १० गुण आहेत. या स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि यूपी वॉरियर्स यांच्यात सामना होणार आहे .