June 1, 2025 1:59 PM June 1, 2025 1:59 PM

views 12

IPL Cricket: अंतिम सामन्यात स्थानाकरता मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज्स सज्ज

आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्याकरता आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज्स यांच्यात दुसरा पात्रता सामना होणार आहे. अहमदाबाद इथं आज संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल.   या क्वालिफायर टू अर्थात, दुसऱ्या पात्रता सामन्यात प्रवेश मिळवण्यासाठी गुणतालिकेत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्समध्ये झालेल्या निर्णायक सामन्यात मुंबईनं गुजरातचा पराभव केला होता.   या सामन्याआधी साखळी फेरीत गुणतालिकेत सर्वोच्च दोन स्थानी...

May 19, 2025 1:19 PM May 19, 2025 1:19 PM

views 8

IPL: स्पर्धेत गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज हे संघ प्लेऑफ मधे दाखल

 आयपीएल च्या काल झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्जच्या विजयामुळे दोन्ही संघांना प्लेऑफचं  तिकीट मिळालं , तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनंही अंतिम चार  संघांमध्ये स्थान मिळवलं आहे. शनिवारी बेंगळुरूमध्ये पावसामुळे सामना रद्द झाल्यानं  गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचा संघ स्पर्धेतून बाद झाला.   आता उर्वरित एका प्लेऑफ स्थानासाठी मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ  सुपर जायंट्स यांच्यात चुरशीची स्पर्धा आहे. अव्वल स्थानावर असलेला  गुजरात टायटन्सचा संघ  टॉप-२ संघांमध्ये स्थान मिळ...

April 9, 2025 1:31 PM April 9, 2025 1:31 PM

views 7

आयपीएल क्रिकेटमध्ये आज गुजरात टायटन्सचा सामना राजस्थान रॉयल्सबरोबर होणार

आयपीएल क्रिकेटमध्ये आज गुजरात टायटन्सचा सामना राजस्थान रॉयल्सबरोबर होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर संध्याकाळी साडेसात वाजता खेळ सुरु होईल. पंजाब किंग्जने काल चंडीगढमधे चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा अठरा धावांनी पराभव केला. दुसऱ्या सामन्यात लखनौ सुपर जायंटस् संघाने कोलकाता नाईट रायडर्सचा चार धावांनी पराभव केला.

April 4, 2025 1:37 PM April 4, 2025 1:37 PM

views 6

ILP: Cricket सामन्यात आज मुंबई इंडीयन्सचा सामना लखनौ सुपर जायंट्स सोबत

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबई इंडीयन्सचा सामना   लखनौ सुपर जायंट्स बरोबर  लखनौ मधे होणार आहे. संध्याकाळी साडे सातवाजता सामना सुरु होईल. काल झालेल्या साखळी सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स  संघाने, सनरायझर्स हैदराबाद संघाचा ८० धावांनी पराभव केला.

March 24, 2025 3:22 PM March 24, 2025 3:22 PM

views 7

IPL : दिल्ली कॅपिटल्स संघाचा सामना लखनौ सुपर जायंट्स बरोबर होणार

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स संघाचा सामना लखनौ सुपर जायंट्स बरोबर होणार आहे. विशाखापट्टणम इथल्या डॉ राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना आज सायंकाळी साडेसात वाजता सुरु होईल.    काल मुंबईत झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने मुंबई इंडियन संघाचा पराभव केला, तर हैद्राबाद इथं झालेल्या सामन्यात सन रायझर्स हैद्राबाद संघाने राजस्थान रॉयल्स चा पराभव केला होता.

March 14, 2025 2:01 PM March 14, 2025 2:01 PM

views 11

IPL 2025 : क्रिकेट संघांचे कर्णधार जाहीर

इंडियन प्रीमीयर लीग क्रिकेटमधे दिल्ली कॅपिटल्सचं कर्णधारपद अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याच्याकडे सोपवण्यात आलं आहे. अक्षर पटेल २०१९ पासूल आयपीएलच्या ६ हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचं नेतृत्व रजत पाटीदारकडे, तर कोलकाता नाईट रायडर्सचं अजिंक्य रहाणेकडे आहे. नव्याने आलेल्या लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत असून पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर आहे.   येत्या २४ मार्चपासून २०२५चा  हंगाम सुरु होत असून पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्समधे विशाखा...