January 5, 2026 3:42 PM January 5, 2026 3:42 PM

views 4

आयपीएल स्पर्धेच्या प्रसारणावर बांगलादेशाकडून अनिश्चित काळासाठी बंदी

बांगलादेशनं आगामी आयपीएल स्पर्धेच्या प्रसारणावर अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे. कोलकाता नाईट रायडर्समधून बांगलादेशचा जलदगती गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याला वगळल्यानंतर बांगलादेशनं हा निर्णय घेतला. रहमान याला संघाबाहेर काढायचा निर्णय बीसीसीआयच्या निर्देशांनुसार घेतला असून त्यामागे कोणतंही तार्किक कारण नव्हतं. याचे तीव्र पडसाद बांगलादेशच्या जनतेत उमटत असून त्यामुळे आयपीएलच्या प्रसारणावर बंदी घातल्याचं बांगलादेश सरकारच्या आदेशात म्हटलं आहे.

January 3, 2026 1:56 PM January 3, 2026 1:56 PM

views 18

KKR मधून बांगलादेशी खेळाडूला वगळावं – BCCI चे निर्देश

२०२६ च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी कोलकाता नाईट रायडर्स संघाने बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजूर रहमान याला संघातून वगळावं असं बीसीसीआय अर्थात भारत क्रिकेट नियामक मंडळाने सांगितलं आहे.  केकेआरने रहमानला आयपीएलच्या लिलावात ९ कोटी वीस लाख रुपयांना खरेदी केलं आहे. बांगलादेशात एका हिंदू तरुणाची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशी खेळाडूला आयपीएलमधे घेण्यावरून वाद सुरू झाला आहे. त्यामुळे बीसीसीआयने बांगलादेशी खेळाडूला वगळण्यास सांगितलं आहे, या खेळाडूच्या ऐवजी दुसरा खेळाडू निवडण्याची संधी केकेआर सं...