April 11, 2025 2:53 PM April 11, 2025 2:53 PM

views 11

IPL: स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज चा सामना कोलकता नाईट राईडर सोबत

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकता नाईट राईडर या संघांमध्ये सामना होणार आहे. चेन्नईच्या चिदंबरम स्टेडिअमवर संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल.  काल बेंगलोरमध्ये झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघावर ६ गडी राखून विजय मिळवला. रॉयल चॅलेंजर्सने दिलेलं १६४ धावांचं आव्हान दिल्ली कॅपिटल्सनं १७ षटकं आणि ५ चेंडूत ४ गड्यांच्या मोबदल्यात पार केलं.

April 8, 2025 1:11 PM April 8, 2025 1:11 PM

views 7

IPL 2025 : आजच्या सामन्यांचं वेळापत्रक !

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांची लढत होणार आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर दुपारी ३.३० वाजता सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी दोन सामने जिंकल्यामुळे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत.   स्पर्धेतला आजचा दुसरा सामना संध्याकाळी ७.३० वाजता चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे. सलग तीनही सामने गमावलेल्या चेन्नईसाठी  हा सामना महत्वाचा आहे. 

April 3, 2025 3:43 PM April 3, 2025 3:43 PM

views 9

IPL: T20 स्पर्धेत KKR आणि SRH आमने सामने

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सचा सामना आज सनरायजर्स हैदराबादशी होणार आहे. हा सामना कोलकात्याच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल.  बेंगळुरु इथं काल रात्री झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु संघाचा आठ गडी राखून पराभव केला. गुजरात टायटन्सने २ गड्यांच्या मोबदल्यात १७ षटकं आणि ५ चेंडूत १७० धावा केल्या. गुजरात टायटन्ससाठी जोस बटलरनं ३९ चेंडूत ७३ धावा केल्या. तर मोहमद्द सिराजनं ३ गडी बाद केले. गुणतालिकेत पंजाब किंग्स पहिल्या स्थानी आहे. ...

March 30, 2025 3:15 PM March 30, 2025 3:15 PM

views 10

IPL 2025 : आजच्या सामन्यांचं वेळापत्रक !

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराईजर्स हैद्राबाद हा सामना  विशाखापट्ट्णम इथं दुपारी साडेतीन वाजता होणार आहे. सनराईजर्स हैद्राबाद संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय  घेतला आहे.   दुसरा सामना, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांमधे गुवाहाटी इथं होईल. खेळ संध्यासाळी साडेसात वाजता सुरु होईल.     

March 27, 2025 8:22 PM March 27, 2025 8:22 PM

views 12

जालन्यात क्रिकेट सामन्यावर सट्टा लावण्याऱ्यांना अटक

आयपीएल क्रिकेट स्पर्धेतल्या, कोलकत्ता नाईट रायडर विरुध्द राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यावर सट्टा लावणाऱ्या चार संशयितांना जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आज अटक केली. संशयितांकडून मोबाईल आणि इतर साहित्य, असा एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

March 23, 2025 1:01 PM March 23, 2025 1:01 PM

views 10

IPL 2025 : आजच्या सामन्यांचं वेळापत्रक !

इंडियन प्रिमियर लीग क्रिकेटमध्ये आज दुपारी साडेतीन वाजल्यापासून सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना रंगणार आहे. हैदराबाद इथं हा सामना होईल. आजचा दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होईल. चेन्नई इथं सायंकाळी साडे सात वाजता हा सामना सुरू होईल.    कालपासून या स्पर्धेला सुरूवात झाली असून कालच्या पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्सचा ७ गडी राखून पराभव केला. 

March 23, 2025 9:08 AM March 23, 2025 9:08 AM

views 8

IPL 2025 : RCB विरुद्धच्या सामन्यात KKR चा ७ गडी राखून पराभव

इंडियन प्रीमियर लीग - आएपीएल क्रिकेटच्या १८व्या हंगामात काल सलामीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं कोलकाता नाईट रायडर्सचा सात गडी राखून पराभव केला. कोलकाता इथं झालेल्या या सामन्यात, कोलकाताच्या संघाने प्रथम फलंदाजी करत निर्धारित २० षटकात आठ बाद १७४ धावा केल्या. प्रत्यूत्तरात बंगळुरुच्या संघाने हे लक्ष्य १७ व्या षटकात तीन गडी गमावत पूर्ण केलं.

March 22, 2025 2:41 PM March 22, 2025 2:41 PM

views 11

१८व्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेला आजपासून प्रारंभ

क्रिकेट रसिकांचं लक्ष लागून  असलेल्या आय पी एल अर्थात इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला आजपासून कोलकात्यात सुरुवात होत आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आज सलामीचा सामना होणार असून एकूण १० संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. आयपीएलचा हा १८वा हंगाम आहे.

March 14, 2025 2:01 PM March 14, 2025 2:01 PM

views 11

IPL 2025 : क्रिकेट संघांचे कर्णधार जाहीर

इंडियन प्रीमीयर लीग क्रिकेटमधे दिल्ली कॅपिटल्सचं कर्णधारपद अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याच्याकडे सोपवण्यात आलं आहे. अक्षर पटेल २०१९ पासूल आयपीएलच्या ६ हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचं नेतृत्व रजत पाटीदारकडे, तर कोलकाता नाईट रायडर्सचं अजिंक्य रहाणेकडे आहे. नव्याने आलेल्या लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंत असून पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर आहे.   येत्या २४ मार्चपासून २०२५चा  हंगाम सुरु होत असून पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्समधे विशाखा...