June 4, 2025 10:37 AM June 4, 2025 10:37 AM
13
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ विजयी
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं विजेतेपद पटकावलं आहे. अहमदाबाद इथं झालेल्या चुरशीच्या लढतीत रॉयल चॅलेंजर्सनं बंगळुरू संघानं किंग्ज इलेव्हन पंजाबचा सहा धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्सनं 190 धावा केल्या तर प्रत्युत्तरादाखल किंग्ज इलेव्हन पंजाबनं 184 धावा केल्या. बंगळुरूच्या कृणाल पांड्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आलं.