August 27, 2025 5:27 PM August 27, 2025 5:27 PM

views 15

क्रिकेटपटू रविचंद्रन आश्विन आयपीएल मधून निवृत्त

क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनने आज आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीगमधून निवृत्तीची घोषणा केली. प्रत्येक सुरुवातीला एक अंत असतो, आपल्या आयपीएल कारकीर्दीचा आज शेवट झाला असं अश्विन समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हणाला. अश्विनने बीसीसीआय आणि आयपीएलच्या सर्व फ्रँचाईजचे आभार मानले.   अश्विनने २००९ ला चेन्नई सुपर किंग्जकडून आपल्या आयपीएल कारकीर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने रायजिंग पुणे सुपरजायंट्स, पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स या संघांचं प्रतिनिधित्व केलं. यावर्षी तो पुन्ह...

June 3, 2025 8:13 PM June 3, 2025 8:13 PM

views 10

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात अंतिम सामना सुरू

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम सामना सुरु आहे. पंजाब किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या ८ व्या षटकात २ बाद ६७ धावा झाल्या होत्या. २००८ पासून सुरू झालेल्या आयपीएल स्पर्धेत आजतागायत या दोन्ही संघांकडे विजेतेपद आलेलं नाही. त्यामुळे दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्त्वाचा आहे.

May 23, 2025 1:34 PM May 23, 2025 1:34 PM

views 10

IPL: आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसमोर सनरायजर्स हैदराबादचं आव्हान

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल अहमदाबाद इथं झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघानं गुजरात टायटन्सवर ३३ धावांनी विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना लखनौच्या संघानं निर्धारित २० षटकांमध्ये २ गड्यांच्या मोबदल्यात २३५ धावा केल्या.   प्रत्युत्तरादाखल गुजरातच्या संघाला २०२ धावाच करता आल्या. लखनौकडून ११७ धावांची खेळी करणाऱ्या मिशेल मार्शला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसमोर सनरायजर्स हैदराबादचं आव्हान असेल. लखनौमध्ये संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू हो...

May 9, 2025 3:50 PM May 9, 2025 3:50 PM

views 10

आयपीएलचे सर्व सामने आठवडाभरासाठी स्थगित

 भारत आणि पाकिस्तान दरम्यान वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आयपीएलचे आजपासून पुढचे सर्व सामने आठवडाभरासाठी स्थगित केले आहेत.   त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन संबंधितांशी चर्चा करून स्पर्धेचं पुढचं वेळापत्रक जाहीर केलं जाईल, असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं. सद्यस्थितीत बीसीसीआय देशासोबत खंबीरपणे असून, भारत सरकार, सशस्त्र दल आणि देशवासीयांच्या पाठीशी असल्याचं पत्रकात म्हटलं आहे.   

April 17, 2025 2:01 PM April 17, 2025 2:01 PM

views 2

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा सामना आज सनरायर्जस हैदराबाद बरोबर होणार

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा सामना आज सनरायर्जस हैदराबाद बरोबर होईल. मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी साडे सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल.

April 17, 2025 11:28 AM April 17, 2025 11:28 AM

views 11

आयपीएल – दिल्ली कॅपिटल्स कडून राजस्थान रॉयल्सचा पराभव

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सनं काल रात्री झालेल्या थरारक सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. दिल्लीत अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं ५ गडी बाद १८८ धावा केल्या. त्यानंतर राजस्थान रॉयल्सनं वीस षटकांमध्ये तेवढ्याच धावा केल्यानंतर सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. स्टार्क स्टेलरच्या भेदक गोलंदाजीमुळे राजस्थान रॉयल्सचे शिमरॉन हेटम्येर ११ धावाच करू शकले. दिल्ली कॅपिटल्सच्या के. एल. राहुल आणि ट्रिस्टन स्टब्ज यांनी हा आकडा सहजपणे पार करत विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्सच...

April 12, 2025 1:13 PM April 12, 2025 1:13 PM

views 8

IPL:- क्रिकेट स्पर्धेत आज 2 सामने होणार

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने होणार आहेत. पहिला सामना दुपारी लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये होणार असून संध्याकाळी सनराइजर्स हैदराबाद आणि किंग्स इलेव्हन पंजाबमध्ये दुसरा सामना रंगणार आहे. गुजरात टायटन्सचा संघ  आतापर्यंत झालेल्या पाचपैकी चार सामन्यांत विजय मिळवत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे.    दरम्यान, काल संध्याकाळी चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट  राईडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात कोलकात्यानं चेन्नईला सहज नमवत  विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई...

April 10, 2025 2:42 PM April 10, 2025 2:42 PM

views 15

IPL: क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्समधे आजचा सामना

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात बेंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर सामना होणार आहे. सामन्याला संध्याकाळी साडेसात वाजता सुरुवात होईल. दिल्ली कॅपिटल्स सलग तीन सामने जिंकत सहा गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु चौथ्या स्थानी आहे.   दरम्यान कालच्या सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा ५८ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २० षटकांत ६ बाद २१७ धावा केल्या. प्रत्युत्तरात, २१८ धावांचा पाठलाग क...

April 9, 2025 10:27 AM April 9, 2025 10:27 AM

views 6

पंजाब किंग्जने चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा अठरा धावांनी केला पराभव

आयपीएल क्रिकेटमध्ये काल पंजाब किंग्जने चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा अठरा धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्ज संघाने वीस षटकांत सहा बाद २१९ धावा केल्या. तर प्रत्युत्तरादाखल चेन्नई सुपर किंग्जला २०१ धावा करता आल्या.   दुसऱ्या सामन्यात लखनौ सुपर जायंटस् संघाने कोलकाता नाईट रायडर्सचा चार धावांनी पराभव केला. आज संध्याकाळी साडेसात वाजता गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स संघांदरम्यान अहमदाबाद इथं सामना होणार आहे.

April 5, 2025 1:48 PM April 5, 2025 1:48 PM

views 8

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चेन्नईमध्ये दुपारी साडेतीन वाजता सामना होणार आहे. तर चंदीगढमध्ये राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात संध्याकाळी ७ वाजता सामना होईल. दरम्यान काल लखनौ सुपर जायंट्सनं मुंबई इंडियन्सचा १२ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या लखनौ सुपर जायन्ट्सनं सलामीवीर मिचेल मार्श आणि एडेन मार्कराम यांच्या अर्धशतकांच्या जोरावर निर्धारित २० षटकांत आठ गडी गमावून २०३ धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून सूर्यकुमार यादवनं ४३ चेंडूत ६७...