February 10, 2025 3:35 PM February 10, 2025 3:35 PM
19
भारतानं आयफोनच्या निर्यातीत ओलांडला १ लाख कोटी रुपयांचा टप्पा
भारतानं चालू आर्थिक वर्षात आयफोनच्या निर्यातीत एक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, अशी माहिती इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. याचं श्रेय सरकारच्या उत्पादनावर आधारित प्रोत्साहन योजनेला त्यांनी दिलं आहे. पुढच्या आर्थिक वर्षात स्मार्टफोनची निर्यात सव्वा दोन लाख कोटी रुपयांवर पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.