October 6, 2025 7:04 PM October 6, 2025 7:04 PM
52
गुंतवणूकदारांनी अधिकाधिक गुंतवणूक करण्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या अमर्याद संधी आहेत, त्यामुळे राज्यात गुंतवणूकदारांनी अधिकाधिक गुंतवणूक करावी, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत ट्वेंटी-ट्वेंटी गुंतवणूक संघटनेच्या शिष्टमंडळासोबत आयोजित बैठकीत बोलत होते. धोरणात्मक सुधारणा, पायाभूत सुविधांचा होत असलेला विकास यामुळे महाराष्ट्र हे देशाचं ' ग्रोथ सेंटर' बनलं आहे. मुंबई ही देशाच्या आर्थिक राजधानी सोबतच मनोरंजन, स्टार्ट अपची सुद्धा राजधानी आहे. त्यामुळे महाराष्ट्र हे देशातलं गुंतवणुकीचं 'मॅग्नेट'ही ठर...