May 12, 2025 1:41 PM May 12, 2025 1:41 PM
3
आज जगभरात आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा
आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त आज जगभरात आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा केला जात आहे. ‘आमच्या परिचारिका-आमचं भविष्य’ ही यंदाच्या दिनाची मध्यवर्ती संकल्पना असल्याचं आंतरराष्ट्रीय परिचारिका परिषदेनं म्हटलं आहे. परिचारिकांचं हितरक्षण केल्यास पर्यायानं देशाची आरोग्यव्यवस्था तसंच समाजाची कार्यक्षमता सुधारेल आणि प्रगती सहजसाध्य होईल, असं केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी समाजमाध्यमांवर म्हटलं आहे. परिचारिकांची करुणावृत्ती आणि कर्तव्यकठोरता या...