November 29, 2024 7:33 PM

views 33

सैद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन उपान्त्य फेरीत दाखल

भारतीय बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन हे दोघे सैद मोदी आंतरराष्ट्रीय सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. सिंधूने चीनच्या दाई वांगचा २१-१५, २१-१७ असा पराभव केला. पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने भारताच्याच मिराबा लुवांग मासनमचा २१-८, २१-१९ असा पराभव केला. महिला दुहेरीत ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद, या जोडीने उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या पाचव्या मानांकित जोडीने उपांत्य फेरीत प्रवेश केला.

November 28, 2024 3:19 PM

views 28

सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे पी.व्ही सिंधूसह ४ खेळाडू उपान्त्यपूर्व फेरीत दाखल

लखनौ इथे सुरू असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी गटात भारताच्या पी. व्ही. सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तिने भारताच्या इरा शर्मा हिचा २१-१०, १२-२१, २१-१५ असा पराभव केला. याच प्रकाराच्या दुसऱ्या सामन्यात भारताच्या उन्नती हुडा हिने पोर्नपिचा चोईकीवोंग हिचा २१-१८, २२-२० असा सरळ गेममध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.   या स्पर्धेच्या पुरुष एकेरी प्रकारात भारताच्या मीराबा लुवांग मैसराम आणि आयुष शेट्टी यांनीही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश क...

September 8, 2024 2:04 PM

views 33

आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन

आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन आहे. व्यक्ती, समुदाय तसंच समाजाच्या दृष्टीनं साक्षरतेच्या महत्त्वाचं स्मरण करून देण्यासाठी दरवर्षी ८ सप्टेंबरला हा दिवस साजरा केला जातो. “बहुभाषिक शिक्षणाला प्रोत्साहन आणि परस्पर सामंजस्य तसंच शांततेसाठी साक्षरता” ही यंदाच्या साक्षरता दिनाची संकल्पना आहे. यानिमित्तानं केंद्रीय शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या वतीनं काल स्पेक्ट्रम ऑफ लिटरसी ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजन केली गेली होती. समकालीन जगातील साक्षरतेशी संबंधित विविध पैलूंवरच्या संशोधनाला व्यासपीठ उपलब्ध क...