June 19, 2025 7:18 PM

views 20

राज्यात योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम

यंदा साजऱ्या होणाऱ्या जागतिक योग दिनानिमित्त राज्यात विविध जिल्ह्यात कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. याच दिवशी योगिनी स्मार्त एकादशी आणि जागतिक संगीत दिन असल्यामुळे सांगली जिल्हा परिषदेने विश्व योग दर्शन यांच्या सहकार्यानं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. सांगलीतल्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम इथं मुख्य केंद्राच्या माध्यमातून आभासी पद्धतीनं एकाच तालावर आणि एकाच वेळी योगासनं करण्यात येणार आहेत.   नाशिक जिल्ह्यात योगदिनानिमित्त महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं भव्य योग ...

June 18, 2025 8:14 PM

views 12

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन

येत्या २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यात विविध जिल्ह्यांत कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नियोजन बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. शहरापासून वाड्या वस्त्यांपर्यंत योग दिनाचं आयोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. योग दिनाचं आयोजन यशस्वी व्हावं यासाठी डिजिटल मदत घेण्याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केलं.   सातारा जिल्ह्यातही योग दिनाचं आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमांना लोकप्रतिनिधींन...

June 18, 2025 2:25 PM

views 10

प्राचीन भारतीय संस्कृतीपासून ते जागतिक चळवळीपर्यंतचा योगसाधनेच्या प्रवासाचा आढावा..

आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात २१ जून रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त प्राचीन भारतीय संस्कृतीपासून ते त्याच्या जागतिक चळवळीपर्यंतचा योगसाधनेच्या प्रवासाचा आढावा घेऊया.. भारतीय संस्कृतीत एक आध्यात्मिक साधना म्हणून योगसाधनेची सुरुवात झाली. आणि हळूहळू आत्म-साक्षात्काराच्या दिशेने एक शिस्तबद्ध मार्ग म्हणून त्याचा विकास झाला. योगसाधनेचा उगम सुमारे ईसापूर्व ५०० सालादरम्यान झाला. कालांतराने, ही साधना एका समृद्ध शाखेत बहरली. ती वेद, उपनिषद आणि नंतर पतंजलीच्या योग सूत्रांमध्ये प्रवाहित झाली. स्वामी विवेका...

May 29, 2025 1:11 PM

views 18

नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर बैठक

आंतरराष्ट्रीय योग दिनाची तयारी संदर्भात नवी दिल्लीत विविध मंत्रालयांमध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महत्त्वाच्या मंत्रालयांमधील वरिष्ठ अधिकारी, आयुष संस्थेचे पदाधिकारी आणि इतर संबंधित उपस्थित होते. येत्या ११ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार असून तो आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा करण्याच्या तयारी संदर्भात चर्चा करण्यात आल्याची माहिती आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितलं.

May 27, 2025 1:30 PM

views 19

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उलटगणतीच्या २५ दिवसीय कार्यक्रमाचं उद्घाटन

केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रताप जाधव यांच्या उपस्थितीत पुदुच्चेरी इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उलटगणतीच्या २५ दिवसीय कार्यक्रमाचं आज उद्घाटन करण्यात आलं. २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुख्य सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विशाखापट्टणम इथल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तत्पूर्वी देशभरात विविध ठिकाणी योग दिनाच्या काउंटडाऊन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे.

June 19, 2024 1:20 PM

views 25

प्रधानमंत्री मोदी यांनी शशांकासनाचा व्हिडिओ केला शेअर

येत्या २१ जूनला साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचं औचित्य साधत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमावर शशकासन करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हे आसन कसे करायचे हे सांगत त्याचे फायदे सांगितले आहेत. हे आसन केल्यामुळे पाठदुखीची समस्या कमी होते. तसंच हे आसन केल्यामुळे ताण, राग कमी होण्यास मदत होते. उच्च रक्तदाब आणि संधीवाताचा त्रास असलेल्या व्यक्तींनी हे आसन करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.   [video width="1280" height="720" mp4="https://www.newsonair.go...