March 8, 2025 9:02 PM March 8, 2025 9:02 PM
9
जागतिक महिला दिनी आज राज्यात विविध कार्यक्रम
जागतिक महिला दिनी आज राज्यात विविध कार्यक्रम झाले. पुणे पोलीस दलातील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वानवडी भागात दुचाकी फेरी काढली. या फेरीत २३२ महिला अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाल्या. जागतिक महिला दिनी गोंदिया शहर पोलीस ठाण्याचा कार्यभार एका दिवसाकरता महिला पोलिसांकडे सोपविण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक आफ्रीदीन बिजली यांनी पोलीस निरीक्षक पदाची जबाबदारी सांभाळली. त्यांनी महिला सहकाऱ्यांनी साथ दिली. अहिल्यानगर मध्ये हिवरेबाजार इथं महिलांच्या सन्मानार्थ विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले ह...