July 29, 2025 3:48 PM

views 16

आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन आज साजरा होत आहे. वाघांचा नैसर्गिक अधिवास सुरक्षित ठेवणं, वाघांच्या संवर्धनासाठी जगभरात होत असलेल्या प्रयत्नांना पाठिंबा देणं आणि याबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी २९ जुलै हा दिवस व्याघ्रदिन साजरा केला जातो.   वाघ हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे; वाघांचं संरक्षण म्हणजे निसर्गाचं संतुलन टिकवणं आणि जीवनाचं खऱ्या अर्थानं रक्षण करणं असल्याचं, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.    दरम्यान, मेळघाट व्याघ्रप्रकल्पातल्या वाघां...