October 15, 2025 9:27 AM October 15, 2025 9:27 AM

views 26

भारतातून अमेरिकेला जाणाऱ्या टपाल सेवेला आजपासून पुन्हा सुरूवात

भारतातून अमेरिकेला जाणारी टपाल सेवा आजपासून पुन्हा सुरू होत आहे. अमेरिकेच्या आयात शुल्क धोरणांच्या अंमलबजावणीनंतर या वर्षी 22 ऑगस्टपासून ही सेवा स्थगित करण्यात आली होती. नवीन रचनेनुसार भारतातून टपालाने अमेरिकेत पाठवण्याच्या पार्सलवर भारतातच शुल्क वसुली होईल.   अमेरिकेत प्रवेश करताना त्यावर पुन्हा उत्पादननिहाय शुल्क आकारलं जाणार नाही. मात्र ही सुविधा फक्त केंद्र सरकारच्या टपाल विभागालाच उपलब्ध आहे. खासगी कुरियर सेवेला तिचा लाभ घेता येणार नाही.  

October 14, 2025 7:24 PM October 14, 2025 7:24 PM

views 28

भारतातून अमेरिकेला जाणारी टपाल सेवा पुन्हा सुरु

भारतातून अमेरिकेला जाणारी टपाल सेवा उद्यापासून पुन्हा सुरु होणार आहे. अमेरिकेच्या आयात शुल्क धोरणांच्या अंमलबजावणीनंतर २२ ऑगस्ट २०२५ पासून ही सेवा स्थगित करण्यात आली होती. नवीन रचनेनुसार भारतातून टपालाने अमेरिकेत पाठवण्याच्या पार्सलवर भारतातच शुल्क वसुली होईल. अमेरिकेत प्रवेश करताना त्यावर पुन्हा उत्पादननिहाय शुल्क आकारलं जाणार नाही.