October 26, 2025 7:40 PM October 26, 2025 7:40 PM

views 30

पोलो चषक स्पर्धेत भारताचा अर्जेंटिनावर १०-९ असा विजय

कोग्नीवीरा आंतरराष्ट्रीय पोलो चषक स्पर्धेत आज नवी दिल्लीच्या जयपूर पोलो मैदानावर रंगलेल्या सामन्यात यजमान भारतानं अर्जेंटिनाचा १०-९ असा पराभव केला. भारतीय संघाचं नेतृत्व जयपूरच्या सवाई पद्मनाभ सिंग यांनी केलं. भारतीय संघाच्या धोरणात्मक आणि  आक्रमक खेळानं हा विजय खेचून आणला. या स्पर्धेच्या माध्यमातून भारतीय पोलो संघाच आंतरराष्ट्रीय पोलो खेळातल कौशल्यही अधोरेखित झालं आहे.