July 25, 2025 8:51 PM July 25, 2025 8:51 PM
14
International Physics Olympiad : भारताला ३ सुवर्ण आणि २ रौप्यपदकं
५५व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या ५ जणांच्या संघानं ३ सुवर्ण आणि २ रौप्यपदकं पटकावली. पुण्याचा कनिष्क जैन, जबलपूरचा स्नेहिल झा आणि इंदोरचा रिद्धेश बेंडाळे यांनी सुवर्ण, तर सूरतचा आगम शहा आणि कोटा इथला रजित गुप्ता यांनी रौप्यपदकाची कमाई केली. पॅरिस इथं झालेल्या या स्पर्धेत भारतानं पदकतालिकेत पाचवा क्रमांक मिळवला.