March 16, 2025 8:24 PM March 16, 2025 8:24 PM

views 10

मास्टर्स लीग स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत – वेस्टइंडीज यांची लढत सुरु

मास्टर्स लीग स्पर्धेचा अंतिम सामना आज मध्य प्रदेशात रायपूर इथं सुरु आहे. सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली भारतीय मास्टर्स संघ आणि ब्रायन लाराच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडीज मास्टर्स संघ यांच्यातली ही लढत संध्याकाळी साडे सात वाजता सुरु झाली. वेस्ट इंडीजनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे.   

March 15, 2025 3:16 PM March 15, 2025 3:16 PM

views 23

आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग: वेस्ट इंडिज मास्टर्सने श्रीलंका मास्टर्सचा ६ धावांनी पराभव

क्रिकेटमध्ये रायपूर इथे झालेल्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात वेस्ट इंडीज मास्टर्सनी श्रीलंका मास्टर्सवर सहा धावांनी विजय मिळवला. उद्या याच मैदानावर होणाऱ्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडीज मास्टर्सची लढत सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालच्या इंडिया मास्टर्सबरोबर होणार आहे.