August 10, 2024 7:31 PM August 10, 2024 7:31 PM
13
मुंबईत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय दागिने प्रदर्शनाचं उद्घाटन
भारतातल्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग निर्यातीत रत्ने आणि दागिने निर्यातीचा मोठा वाटा असून हिरे उत्तेजना परवाना सुरु केल्यामुळे या उद्योगांना लाभ मिळणार असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं आहे. ते आज मुंबईत भारत आंतरराष्ट्रीय दागिने प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. निर्यातीला चालना मिळण्यासाठी आपलं मंत्रालय मुक्त व्यापार करारांवर स्वाक्षऱ्या करण्याची प्रक्रिया वेगाने पार पाडत असल्याची माहिती त्यांनी दिली. याबाबत, युरोपीय संघ आणि इंग्लंड सोबत चर्चा पु...