June 21, 2025 8:05 PM
12
जगातला तणाव आणि अस्थिरतेच्या काळात योग साधना शांततेचा मार्ग दाखवतो-प्रधानमंत्री
११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन आज सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त उत्तराखंडमध्ये डेहराडूनमध्ये झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सहभागी झाल्या होत्या. योग ही निरोगी जीवन जगण्याची कला आहे, हा केवळ व्यायामाचा प्रकार नाही तर संतुलित जीवनशैलीचा आधार आहे असं त्या यावेळी म्हणाल्या. जागतिक समुदायात योग साधनेबद्दलचा आदर वाढला असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं. योग साधनेनं आज संपूर्ण विश्वाला जोडलं आहे हे बघणं अत्यंत सुखद आहे असं प्रधानमंत्री ...