July 20, 2025 1:06 PM July 20, 2025 1:06 PM
21
आज ‘बुद्धिबळ दिन’ !
जगभरात आज ‘बुद्धिबळ दिन’ साजरा होत आहे. याच दिवशी १९२४ साली जागतिक बुद्धिबळ महासंघाची स्थापना झाली होती. बुद्धिबळाच्या खेळाचा वापर समावेशकता, प्रशिक्षण, सक्षमीकरण आणि मानसिक स्वास्थ्यासाठी व्हावा या हेतूने महासंघाने हे वर्ष ‘सामाजिक भानासाठी बुद्धिबळ वर्ष’ म्हणून घोषित केलं असून या वर्षीचा विषय ‘प्रत्येक चाल महत्वाची’ असा आहे. बुद्धीबळाच्या खेळासारखाच, आयुष्यातला देखील प्रत्येक निर्णय आपल्या जीवनाला योग्य दिशा देऊ शकतो हे या बोधवाक्यातून दर्शवून द्यायचं आहे.