September 9, 2024 2:57 PM September 9, 2024 2:57 PM
8
आंतरराष्ट्रीय बौद्ध मीडिया कॉनक्लेव्हचं ११ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत आयोजन
जागतिक संकटांना तोंड देण्यासाठी आणि माध्यमांवरचा विश्वास वाढवण्यासाठी बौद्ध शिकवणीचा वापर व्हावा या उद्देशानं येत्या ११ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय बौद्ध मीडिया कॉनक्लेव्ह आयोजित करण्यात आली आहे. संघर्ष टाळून शाश्वत विकासासाठी संवाद साधणं ही या बैठकीमागची संकल्पना आहे. सजग संवाद आणि नैतिक पत्रकारितेला चालना देणं तसंच संपूर्ण आशिया खंडातल्या बौद्ध माध्यम व्यवसायिकांमध्ये संवाद वाढवणं हेही या बैठकीचं उद्दिष्ट असून या बैठकीला १८ देशातले माध्यमांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहे.